विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनपेक्षित निकाल लागून महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. त्याची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षासाठी काम करण्याची तयारी दाखवली. त्यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली. परंतु, शाह यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. त्या पाठोपाठ महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाने या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस नसतील, ते सरकार अमान्य असल्याचा ठराव मंजूर केला. All BJP mlas strongly supported devendra fadnavis leadership
लोकसभा निवडणुकीची समीक्षा करण्यासाठी भाजप आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत अनेक वरिष्ठ नेत्यांनी परखडपणे आपली मते मांडली. सर्व आमदारांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहून ते सरकारमध्ये नसतील, तर ते सरकार अमान्य असेल, असा ठराव मंजूर केला.
आशिष शेलार म्हणाले :
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आयुष्याचा लेखाजोखा जेव्हा मांडला जाईल तेव्हा त्यात 2019-24 हा कालखंड संकटांचा मुकाबला कसा केला, याचा गौरवशाली अध्याय लिहिला जाईल.
2014 ला राज्यात सरकार आले. विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणले. कोस्टल रोड, समृद्धी सारखे प्रकल्प उभे करण्याचे व्हिजन फडणवीस यांनी दाखविले. मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्राची सेवा केली. केवळ पक्षाचा आदेश म्हणून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत सरकार हे भाजपा विधीमंडळ पक्षाला मान्य नाही. आशिष शेलार यांनी मांडला ठराव सर्वांनी उभे राहून, टाळ्या वाजवून केले अनुमोदन
नितेश राणे म्हणाले :
आपण प्रत्येकाच्या मागे ताकदीने उभे राहिला. सरकार सोबतच पक्षात सुद्धा पूर्ण ताकदीने आपणच आम्हाला हवे आहात.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले :
सरकारमधून बाहेर पडून पक्षासाठी काम करण्याच घोषणा करून तुम्ही महाराष्ट्राला शॉक दिला आहे. तुम्ही स्वतःला मागे ठेवून आमदार आणि कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे म्हणून काम करता. 42 खासदार/122 आमदार हाही विक्रम मोदीजी यांच्या नेतृत्वात तुम्हीच केला. शेवटचा माणूस सुखरूप घरी जात नाही, तोवर “वर्षा”वरचे लाईट बंद होत नव्हते. अलीकडे घरातून न निघणारा मुख्यमंत्री आपण पाहिला. तुम्ही सरकारमध्ये न राहणे हे आम्हाला मान्य नाही. एका मॅचमध्ये कमी पडलो तरी सचिन तेंडुलकरची उंची कमी होत नाही. तुम्ही आमचे सचिन तेंडुलकर आहात. आजच निर्णय द्या, नाहीतर आम्ही या सभागृहाबाहेर जाणार नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
देशाच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीजी असे 60 वर्षांनी घडले. महाराष्ट्राच्या मनात सल; 2014 आणि 19 सारखा मोदींच्या यशातील वाटा आपण यंदा उचलू शकलो नाही.
पावसाचा काळ सुरू झाला, पेरणीचा काळ. आज जे पेराल ते पीक ऑक्टोबरमध्ये येईल. आपण सर्वांनी प्रचंड मेहनत केली. मी उपमुख्यमंत्री पद सोडतो, पक्षाला पूर्णवेळ देतो, हे मी निराशेतून किंवा भावनेच्या भरात बोललो असे नाही. माझ्या डोक्यात आराखडा पक्का आहे. देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही. लढणारा माणूस आहे. काल अमित शाह यांच्याशी पण बोललो. त्यांचीही तीच भूमिका की सध्या काम सुरू ठेवा.
काँग्रेसला 3 लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाला या एका निवडणुकीत. “इंडी” आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागा, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाला मिळाल्या.
मुंबईत आपल्याला 2 लाख मते अधिक या निवडणुकीत 3 पक्ष तर होतेच, पण चौथा पक्ष होता खोटे नॅरेटिव्ह. त्याला काउंटर करण्यात आपण कमी पडलो. खोट्या मुद्द्याची ताकद एखादी निवडणूक चालते. नेहमी चालत नाही. संविधान बदल अपप्रचार केला गेला. पक्ष फोडाफोडीचा नॅरेटिव्ह तयार केला गेला. दोन वेळा मराठा आरक्षण आपण दिले आणि त्याचाही खोटा नरेटिव्ह तयार केला गेला.
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला तरी उद्योग पळविण्याचा खोटा नरेटिव्ह तयार केला गेला. महाविकास आघाडी काळात गुजरात पुढे होता, आता गुजरातपेक्षा दुप्पट गुंतवणूक आपण आणली. मग उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा नरेटिव्ह तयार केला गेला. पण ठाणे, कल्याणपासून ते कोकणापर्यंत एकही जागा उबाठा गटाला मिळाली नाही.
मराठी मतं उद्धव ठाकरे यांना मिळालेली नाही, नाहीतर वरळीत इतकी कमी मते मिळाली नसती. आता तर जिंकून आलेले त्यांचे खासदार सांगतात, मराठा-दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांवर निवडून आलो. धुळे, अमरावतीत काय झाले, हे सर्वांना माहिती आहे.
11 जागा केवळ 3 % मतांनी आपण गमावल्या शिवसेनेच्या 7 जागा निवडून आल्या. अनेक ठिकाणी लीड भाजपाने दिली आहे.
पराभव झाला म्हणून एकमेकांवर आगपाखड करणे योग्य नाही. काल मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितले. आता एका सुरात बोलले पाहिजे. एकमेकांच्या प्रवक्त्यांनी बातम्या पेरणे बंद केले पाहिजे.
133 विधानसभा मतदारसंघात आपण पुढे आहोत. आपण विश्वास दाखविला, त्याबद्दल आभारी आहे. मी स्वतः दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो आहे. तुम्ही पण थांबू नका. कामाला लागा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App