प्रतिनिधी
नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांना अर्थमंत्री पद देण्यावरून शिंदे शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी आज नाशिकच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट खुलासा केला. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते अर्थमंत्री असताना काही चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्त करण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर इथून पुढच्या काळात निधी वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ, असे आश्वासन अजितदादांनी याच पत्रकार परिषदेत दिले. Ajitdad’s admission of discrimination in earlier allocation of funds
अजित पवारांना अर्थमंत्री पद देण्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रचंड नाराजी असल्याचा प्रश्न पत्रकारांनी अजितदादांना विचारला. त्यावर खुलासा करताना अजितदादा म्हणाले, नाराजीच्या बातम्या फक्त प्रसार माध्यमांनी चालवल्या. त्यातल्या बहुतेक टेबल न्यूज होत्या. पण आधीच्या सरकारमध्ये काही चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्त करता येतील. शेवटी काम करतो तोच माणूस चुकतो. जो कामच करत नाही तो चुकत नाही. त्यामुळे कोणा लोकप्रतिनिधींच्या काही तक्रारी असतील आणि त्या तक्रारींमध्ये काही तथ्य असतील तर त्या तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः बैठक घेऊन दूर करू. हे महायुतीचे सरकार आहे .त्यामुळे तीन पक्षांच्या लोकप्रतिनिधींमध्ये कोणताही गैरसमज राहणार नाहीत. कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ, अशी ग्वाही अजितदादांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादीला अजितदादांचे झुकते माप
अजितदादा महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना झुकते माप देऊन तब्बल 54 % निधी दिला होता. शिवसेनेचे 56 आमदार असून त्यांना फक्त 16 % टक्के निधी दिला होता, तर काँग्रेसच्या 44 आमदारांना 42 % निधी दिला होता.
त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये त्यावेळी प्रचंड संताप होता. तो संताप उफाळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड केले आणि ठाकरे – पवार सरकार पाडले. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे – फडणवीस सरकार बनले आणि त्यात आता अजितदादा अर्थमंत्री बनले. अजित दादांच्या अर्थमंत्री बनण्यामुळे शिंदेचे आमदार अस्वस्थ झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.
या राजकीय पार्श्वभूमीवरच अजित दादांनी आधीच्या सरकारमध्ये निधी वाटपात काही चूक झाल्याची कबुली दिली. त्याचबरोबर ज्या तक्रारी असतील त्या दूर करण्याचीही ग्वाही दिली. आताचे सरकार तीन पक्षांचे आहे, हे मलाही समजते. त्यामुळे ज्या कोणाच्या तक्रारी असतील आणि त्यामध्ये काही तथ्य असेल तर त्या एकत्रित बैठक घेऊन दूर करता येतील, असे अजितदादा आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना टोला
त्याचवेळी जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही तो चुकत नाही, असे सांगून अजितदादांनी स्वतः विषयी कबुली देतानाच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला हाणला.*
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more