मराठा आंदोलनाचे हिंसक पडसाद; अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर, गाडी जाळली!!; जरांगे पाटील स्टेजवर कोसळले!!

प्रतिनिधी

मुंबई : मराठा आंदोलनाचे हिंसक पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत. अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर माजलगाव मध्ये मराठा आंदोलकांनी प्रचंड दगडफेक केली. घराच्या पोर्चमध्ये उभी असलेली त्यांची आलिशान गाडी जाळली. त्यावेळी प्रकाश सोळंके घरातच होते. प्रकाश सोळंके त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा आंदोलन चिडल्याचे सांगितले जाते. Ajitdada MLA Prakash Solanke’s house and car were burnt

मराठा समाजाला टिकणाऱ्या आरक्षण द्यायचे असल्याने अशी घाई गर्दी करून चालत नाही, अशा आशयाचे उद्गार प्रकाश सोळंके यांनी काढले होते. त्यावर मराठा समाज संतप्त झाला आणि त्यांनी प्रकाश सोळंके यांच्या घरावर प्रचंड दगडफेक केली. पोर्चमध्ये उभी असलेली गाडी जाळी माजलगाव मध्ये अनेक ठिकाणी त्याचे हिंसक पडसादही उमटले. कराडमध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाने मोर्चा काढला.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुणबी दाखल्यासंदर्भात मोठी घोषणा केली. मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देता येऊ शकेल, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. मनोज जरांगे पाटलांनी आपले उपोषण मागे घ्यावे. अन्न पाणी घ्यावे. डॉक्टरी उपचाराला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठा समाजाने महाराष्ट्रात 58 मोर्चे काढले ते सर्व शांततेत काढले त्याला कुठेही तुमचे गालबोट लागले नाही आता देखील मराठा समाजाने शांततेतच आंदोलन करावे कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले पण महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटत आहेत.

जरांगे पाटील देखील आपल्या निर्णयावर ठामच आहेत. काल त्यांनी एक घोट पाणी घेतले, पण आज पाणी घ्यायला त्यांनी नकार दिला. अखेरीस ते स्टेजवरच कोसळले. त्यामुळे अंतरवली सराटीत जरांगे पाटलांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

Ajitdada MLA Prakash Solanke’s house and car were burnt

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub