पत्रकार परिषदेत अजितदादांकडून स्वतःच्याच माणसांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल; महेश लांडगेंची सोशल मीडियावर पोस्ट!!

Ajitdada

विशेष प्रतिनिधी

पुणे : पिंपरी चिंचवड मधील भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढायच्या नादात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्वतःच्याच माणसांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन स्थानिक भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे खाल्ले. अगदी कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खाल्ले, असा आरोप त्यांनी केला.Ajitdada exposes corruption of his own people in press conference

त्या पलीकडे जाऊन अजित पवारांनी काही कागदपत्रे दाखवून सफाई कामगारांच्या कामात मोठ्या घोटाळा झाला, असा आरोप केला. त्याच्यात गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर, एजी एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट या दोन ठेकेदारांच्या विरोधात एफआयआर नोंदविला. कचऱ्याच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला, असे अजित पवार म्हणाले.



पण अजित पवारांनी दिलेली माहिती त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळ्यात आली. पिंपरी चिंचवड मधल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तानाजी खाडे यांचे भाऊ धनाजी खाडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेलाय, तर रुपीनगरच्या प्रभाग क्रमांक बाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार चारुलता सोनवणे यांचे सासरे रवींद्र सोनवणे यांचे उजवे हात स्वप्निल काळे यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवला गेलाय.

ही सगळी माहिती भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून दिली. अजित पवारांनी भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा आव आणताना स्वतःच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भ्रष्टाचार लोकांसमोर आणल्याचे स्पष्ट झाले.

Ajitdada exposes corruption of his own people in press conference; Mahesh Landge’s post on social media!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात