विशेष प्रतिनिधी
शिर्डी : अजितदादांना रात्रीची झोप लागत नाही म्हणून ते पहाटे 6.00 वाजल्यापासून काम करतात. शिस्तीच्या नावाखाली अधिकाऱ्यांच्या विनापरवानगी बैठका लावतात, पण ते अधिकाऱ्यांना बिलकूल आवडत नाही, अशा शब्दांत शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज शरसंधान साधले. शिर्डीतल्या राष्ट्रवादी कार्यकर्ते मेळाव्यात ते बोलत होते. Ajitdad works from 6.00 am as he does not get sleep at night
अजितदादा पक्षातून पुन्हा फुटतील असे शरद पवार यांना वाटत नव्हते, तर पक्षातील एक बडा खासदारच पक्षात बंड करेल, असं शरद पवार यांना वाटत होते. तसे शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना बोलूनही दाखवले होते. जितेंद्र आव्हाड यांनीच त्याबाबतचा गौप्यस्फोट केला.
सुनील तटकरे हे इमान राखून नाहीत हे शरद पवार यांना माहिती होते. त्यामुळे शरद पवार यांनी मला सांगितल होत की, सुनील तटकरे हे पुढील पाच वर्षात पक्षात टिकणार नाही, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुनील तटकरे हे दिवस रात्र शरद पवार यांच्याकडे येऊन एकच बोलायचे, चला ना भाजपसोबत जाऊ या. 2019 ला अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला. सुनील तटकरे तेव्हा शरद पवार यांच्या घरी सकाळी 8.00 वाजता आले. तुम्हाला वाटतं का सुनील तटकरे याना काही माहीत नाही? सुनील तटकरे यांच्या सारखा नटसम्राट मी पाहिला नाही, अशी जोरदार टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
तुम्ही काय अजित पवार यांना राम मंदिरात जाऊन दर्शन देणार आहेत का?? ज्या शरद पवारांच्या घरात राहून तुम्ही राजकरण केलं आणि त्यांना तुम्ही घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात? त्यामुळे तुम्हाला रामाचं दर्शन घेण्याच अधिकार नाही, असे ते म्हणाले.
अजितदादांना झोप लागत नाही म्हणून…
अजित पवार यांनी आघाडीच्या सरकारमध्ये असताना चंद्रशेखर बावनकुळे यांना किती मदत केली याची माहिती काढा. अजित पवार यांची वर्किंग स्टाईल वेगळी आहे. त्यांचा पॉलिसी मेकिंगचा एक तरी निर्णय मला त्यांनी सांगवा. शरद पवारांनी पॉलिसीवर 100 निर्णय घेतले आहेत. अधिकाऱ्यांना लवकर उठवून काही काम होत नाही. अजित पवार यांना झोप लागत नाही त्यामुळे ते सकाळी 6 वाजता उठून काम करतात आणि त्यांचं अस वागणे अधिकाऱ्यांना सुद्धा आवडत नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिस्त म्हणजे प्रत्येक विभागात मधेमधे करणं… अनेक विभागांच्या विनापरवानगी बैठक लावणं असं नाही. उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक आहे, असंही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App