विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप सरकारकडून तपास यंत्रणांचा चुकीचा वापर केला जात आहे असे आरोप महाविकास आघाडीतील बऱ्याच नेत्यांनी केले आहेत. याच पाश्र्वभूमीवर जरंडेश्वर साखर कारखान्यातील व्यवहारदेखील मोठा राजकीय वादाचा विषय बनला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी सतत अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट करून मोठमोठे आरोप केलेले आहेत. अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी ईडीचे छापे देखील पडले होते. या सर्व गोष्टींनंतर अजित पवार यांनी उद्या पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबींचा खुलासा करणार आहोत असे नुकतेच जाहीर केले आहे.
Ajit Pawar’s press conference in Pune tomorrow
आपल्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावत असताना ते म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखाना ही केस सध्या ईडीकडे आहे. कोर्टात हे प्रकरण चालू आहे. भाजपाचं सरकार असताना सीआयडी, एसीबीची चौकशी झाली. इओडब्ल्यूचीही चौकशी झाली. सहकार विभागाने निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत देखील चौकशी झाली. राज्यात फक्त जरंडेश्वर कारखाना विकला गेलेला नाहीये. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे आणि त्याचसाठी मला सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
ED Raid Ajit Pawar : सगळे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे तरीही उपमुख्यमंत्री म्हणतात…माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले?
पुढे ते म्हणतात, जरंडेश्वर कारखान्याची सर्व कागदपत्र देखील माझ्याकडे आहेत. उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेईन. राज्यात सुरुवातीपासून किती कारखाने, कुणाच्या कारकिर्दीत किती किमतीला विकले गेले याची माहिती देईन. काही कारखाने ३ कोटी, ४ कोटी, १२-१५ कोटी अशा किमतीला विकले गेले आहेत असा सणसणीत आरोप त्यांनी या वेळी केला आहे.
पुढे ते म्हणतात, आज राज्यामध्ये 12 ते त13 कारखाने चालवायला देण्याचे टेंडर निघाले आहे.काही कारखाने 20-25 वर्षं चालवायला दिले जातात. कारखान्याची अशी वस्तुस्थिती असताना जाणीवपूर्वक काही लोकांनी जरंडेश्वर कारखान्याचा विषय पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. असे देखील ते म्हणाले.
‘मी एकूण 1990 सालापासून राजकारणात काम करतोय. मला उभा महाराष्ट्र ओळखतो. मी बेईमान नाही मी शब्दांचा पक्का आहे. मी कधीही खोटे बोलणार नाही. आणि मला जनतेचा पाठिंबा आहे असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App