विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेले बजेट म्हणजे घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.Ajit Pawar’s budget is a rain of announcements and drought of plans, criticism of Sadabhau Khot
खोत म्हणाले, शेतकऱ्यां ना,शेतमजुरांना व बारा बलुतेदारांना काहीही मिळाल नाही. 50 हजार रुपये मागच्या शेतकऱ्यांना पैसे देऊ म्हणून घोषणा केली. पण ते कधी मिळणार अजून माहिती नाही. दोन लाखाच्या वरती ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्यांना काय देणार या सर्व बाबींवर सरकार काहीही बोलेल नाही.
वीज बिलाच्या मुद्यावर सरकारनं काही म्हटलेलं नाही. वीज माफी दिली पाहिजे होती पण वीज बिलाबाबत सरकार काहीही बोललेल नाही. सोन्या वरचा टॅक्स कमी केलं, बिल्डरांच्या खरेदी व्यवहारावर चे टॅक्स कमी केले. परंतु डिझेल पेट्रोलचा टॅक्स कमी केला नाही. या राज्यातल्या शेतकºयांना काही दिलं नाही.
या राज्यातल्या बारा बलुतेदारांना काही दिले नाही. राज्यातल्या धनगर, माळी, ओबीसीसमाज यालाही काही दिलेलं नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा दिलासा या राज्यातल्या जनतेला देण्याचे काम या सरकारने केलेले नाही.
खोत म्हणाले, एसटी कर्मचाºयांच्या तोंडाला तर पाने पुसली. सध्या एसटी बंद आहेत पहिल्या जुन्या एसटी गाड्या सडायला लागलेल्या आहेत आणि नवीन 3000 एसटी आम्ही खरेदी करणार म्हणजे परत हे या माध्यमातून कमिशन खायला मोकळे. असा हा दिशाहीन आणि भरकटलेला अर्थसंकल्प आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App