
विशेष प्रतिनिधी
पुणे : जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र, कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे. पण लगेच आता तुम्ही कोंबड्या मारून जाळून टाकण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. Ajit Pawar’s appeal while disclosing on GBS
पुण्यासह राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे जीबीएस आजाराचा उद्रेक झाला आहे.
जीबीएस आजार हा पाण्यामुळे होत असल्याचा दावा याआधी केला जात होता. पण या आजाराचं संक्रमण फक्त दुषित पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याची माहिती उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मांस कच्चे, कमी शिजवलेले खाल्ल्याने होत असल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, आगामी काळात पिंपरी चिंचवडची लोकसंख्या पुण्याहून अधिक वाढणार आहे. त्या संदर्भात पाण्याचे नियोजन केले जाणार आहे
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात आधुनिक तंत्रज्ञान वापरून उपाय योजना केले जाणार आहेत.
नदी सुधार प्रकल्पाबाबत तज्ञांशी चर्चा करून मार्ग काढत आहोतआगामी महापालिका निवडणुकीसाठी चांगले वकील देऊन ओबीसी सह सर्व घटनांना आरक्षण देऊन निवडणुका होण्यासाठी प्रयत्न करत आहोत
शिंदे आणि फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचे सांगताना तुम्हाला बातम्या नसल्या की तुम्ही त्या बातम्या चालवत असता अशा शब्दांत पवार यांनी माध्यमांना झापले.
लव्ह जिहाद विरोधी कायद्यासंदर्भात समितीचा अहवाल तर येऊ दे. तुम्हाला एव्हढी घाई का झालीय असा सवाल अजित पवार यांनी केला.
धस आणि मुंडे यांच्या भेटीत गैर काय? ते मंत्री आहेत, ते आमदार आहेत. आजारी असल्याने माणुसकीच्या नात्याने भेट घेण्यात गैर नाही. पण धस-मुंडे भेटीवर देशमुख कुटुंबियांच्या भावनाही योग्य आहेत असे त्यांनी सांगितले.
राहुल सोलापूरकर प्रथमदर्शनी दोषी नाहीत. मात्र, अजून तपास सुरू आहे. त्यातून जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल, असे पवार म्हणाले.
Ajit Pawar’s appeal while disclosing on GBS
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…