विशेष प्रतिनिधी
पुणे : महायुतीमध्ये राहून महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचा विचार करण्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भरण पोषण चालविले आहे. सरकारी खर्चाने सुरू झालेल्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचे स्वपक्षीय नामकरण परस्पर करून त्या योजनांचा पक्षीय लाभ घेण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी अजितदादांवर संताप व्यक्त करून त्यांच्या जनसन्मान यात्रेस काळे झेंडे दाखविले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जनसन्मान यात्रेनिमित्त जुन्नरमध्ये आहेत. मात्र या ठिकाणी अजित पवारांना महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबरच राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या रोषाचाही सामना करावा लागला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडा दाखवल्याचा प्रकार जुन्नरमध्ये घडला.
का दाखवले काळे झेंडे?
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशाताई बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. जुन्नर हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केले. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलले. त्यांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतो असे म्हणज आशाताई बुचकेंसहीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली. अजित पवारांचा ताफा ज्या ठिकाणावरुन बैठकीचे आयोजन केलेल्या सभागृहात जात होता त्याच मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं.
Indian Army : भारतीय लष्कराने इतिहास रचला, 15 हजार फूट उंचीवर जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल बनवले
शिंदे गटाचा बहिष्कार
अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या बैठकीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनेही बहिष्कार टाकण्यात आला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या ‘जन सन्मान’ यात्रेत ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचे नाव बदलून ”’माझी लाडकी बहीण”’ असे नामकरण करून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. राज्यात महायुती असतानाही आंबेगाव शिरूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री या नावाला बगल दिली जात असल्याने शिवसैनिकांनी नाराज होऊन आजच्या कार्यक्रमावर आणि बैठकीवर बहिष्कार घातला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज जुन्नरमध्ये विविध कार्यक्रम आणि बैठका पार पडणार आहेत. आंबेगाव विधानसभा क्षेत्रात अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जन सन्मान यात्रेनिमित्तची सभा दुपारी 1.00 वाजता होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App