विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे पवार कुटुंबातल्या ज्येष्ठ सुना कौटुंबिक ऐक्य घडवण्यासाठी देवाला साकडे घालून बसल्या, तर दुसरीकडे पुतण्या काकांचा पक्ष पुन्हा फोडण्यासाठी जाळ लावून बसलाय, अशी घडामोड महाराष्ट्रात घडतेय.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी जानेवारीच्या पहिल्याच तारखेला पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन त्याला पवार कुटुंबाच्या ऐक्यासाठी साकडे घातले. त्याआधी रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी रोहित पवारांचा कर्जत जामखेड मधून निसटता विजय झाल्याबरोबर पवार कुटुंबाच्या ऐक्याची हाक दिली.
पण एकीकडे पवार कुटुंबातल्या या ज्येष्ठ सुना कौटुंबिक ऐक्यासाठी झगडत असताना दुसरीकडे मात्र पुतण्या काकांचा पक्ष पुन्हा फोडण्याच्या दिशेने कामाला लागला. अजित दादांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या खासदारांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देऊन त्यांच्या पुनर्वसनाची तयारी दाखवली. पण ही ऑफर देताना अजितदादांच्या राष्ट्रवादीने खुद्द शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना वगळून टाकले. पवार आणि सुप्रिया यांना वगळून अन्य 7 खासदारांची पुनर्वसनाची जबाबदारी अजितदादांनी घेतली. अशी बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली.
Pankaja Munde “ते” बीडचे पर्यावरण सुधारतील; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास!!
पण या ऑफरची “भनक” शरद पवारांना लागताच त्यांनी अजित पवारांच्या नेत्यांना छापले आणि तसे काहीही न करण्यास बजावले त्यामुळे ऑफर मधून निर्माण झालेले ऐक्य प्रयत्न सध्या तरी “थंड” पडले, असे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत नमूद केले आहे. अन्यथा ते प्रयत्न यशस्वी झाले असते, तर पवार कुटुंबाचे ऐक्य दूर, पण दोन राष्ट्रवादी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला एकत्र आल्याचे चित्र दिसले असते. पण सध्या तरी हे प्रयत्न “थंड” पडले असले, तरी नजीकच्या भविष्यात ते पुन्हा सुरूच होणार नाहीत याची कोणीही गॅरेंटी देऊ शकत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App