विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, पार्थ पवार यांनी भेट दिली. शरद पवार यांचे आर्शीवाद घेण्यासाठी आलो असल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह इतर सर्व नेत्यांचे स्वागत केले.Ajit Pawar
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे.शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या सर्व नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र, आमची राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. परभणी येथील प्रकरण, राज्यसभेतील चर्चा आदी जनरल विषयावर आमच्यात चर्चा झाली असल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी आलो असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आज शरद पवार तर उद्या काकींचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांचे आर्शीवाद घेतले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
शरद पवार यांच्यासोबत आम्ही गेली अनेक वर्षे काम करत आहोत. तेव्हापासून दरवर्षी आम्ही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतो. त्यात खंड पडू देणार नाही. तसे या वर्षी देखील शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राजकारण हे राजकारणाच्या जागी असते. शरद पवार यांच्या विषयी आमच्या मनात अजूनही प्रेम आणि आदर कायम असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांची भेट ही कौटुंबिक होती. आमच्या कुटुंबाने कायमच राजकारण वेगळे ठेवले असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. आम्ही एकमेकांविरोधात कधीही खालच्या पातळीवर टीका केली नसल्याचेही युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App