राष्ट्रवादीत एकजूट, पण राष्ट्रवादीवर बोलायचे अधिकार “त्यांना” कोणी दिले??; अजित पवारांचा ठाकरे – राऊतांवर निशाणे!!

प्रतिनिधी

मुंबई : अजित पवार बंडखोरी करणार नाहीत. 40 आमदारांच्या सह्या झालेल्या नाहीत. अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत राहूनच काम करणार, असे एका पाठोपाठ एक खुलासे करताना विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीतल्या ऐक्यावर भाष्य केले, पण त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील वेगळे निशाणे साधले.Ajit Pawar targets Uddhav Thackeray and Sanjay Raut while explaining NCP is not going to split

अजितदादा बंड करणार. 40 आमदारांच्या सह्यांनिशी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा देणार किंवा ते एकनाथ शिंदेंना दूर करून मुख्यमंत्री बनणार, अशा बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चविष्टपणे चर्चिल्या जात होत्या. या मुद्द्यावरून आज सकाळी बारामतीत शरद पवारांनी पत्रकारांनाच तुमच्या जे मनात आहे, ते आमच्या मनात नाही. बाकी कोण काय बोलतात ते महत्त्वाचे नाही. मी जे बोलतो ते महत्त्वाचे आहे. तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही, असे सुनावले.



 

त्यानंतर दुपारी अजित पवारांनी राष्ट्रवादीतून कोणताही आमदार फुटणार नाही. अजित पवार तर कुठेच जाणार नाही. आम्ही सगळे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतच काम करू, असे स्पष्ट केले.

पण हे स्पष्ट करतानाच त्यांनी बाकी कोणत्या पक्षाचे काही नेते राष्ट्रवादीचे प्रवक्त असल्यासारखे भाष्य करायला लागले आहेत. बोलायला, लिहायला लागले आहेत. त्यांना कोणी तसा अधिकार दिला?? राष्ट्रवादी बद्दल बोलायला राष्ट्रवादीतले नेते आणि कार्यकर्ते समर्थ आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते समर्थ आहेत, असे उद्गार अजितदादांनी काढले.

त्याचवेळी कोणी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की ते म्हणाले भाजपशी मी एकटा लढीन. वास्तविक पाहता मी पण त्यांच्याबरोबर होतो. ते नागपूरला विमानातून आले होते. त्यांच्या विमानात जागा आहे का? असे विचारल्यावर ते हो म्हणाले. आम्ही दोघे एकत्रच परत आलो. पण त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले मी एकटा लढेन. तसाच प्रश्न पृथ्वीराज बाबांना विचारला त्यामुळे त्यांना काही उत्तर द्यावे लागले. पण एकूणच राष्ट्रवादीतल्या घडामोडींबद्दल जे काही बोलायचे ते आम्ही बोलू. इतरांनी बोलायचे कारण नाही, अशा परखड शब्दांमध्ये अजितदादांनी पत्रकार आणि बाकीच्या नेत्यांना सुनावले.

राष्ट्रवादीत सगळे अलबेला चालले आहे. 40 आमदारांच्या सह्या झालेल्या नाहीत. राष्ट्रवादी एकजुटीने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे, असे सांगतानाही अजितदादांच्या पुढच्या वक्तव्यातून महाविकास आघाडीच्या दोन वज्रमूठ सभा होऊनही महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचेच स्पष्ट झाले.

Ajit Pawar targets Uddhav Thackeray and Sanjay Raut while explaining NCP is not going to split

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात