Ajit Pawar अजितदादांना मुख्यमंत्री करायची त्यांच्या शिलेदारांची घाई; पण फडणवीस सरकारच ५ वर्षे टिकण्याची अजितदादांची ग्वाही!!

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजितदादांना मुख्यमंत्री करायची त्यांच्या शिलेदारांची घाई, पण फडणवीस सरकारच पाच वर्षे टिकण्याची अजितदादांना विधानसभेत द्यावी लागली ग्वाही!! Ajit Pawar

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा त्यांच्या आई पासून ते त्यांच्या सगळ्या आमदारांपर्यंत सगळ्यांनी व्यक्त केली. समर्थकांनी तर त्यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून हजारदा पोस्टरवर चढवले. अगदी कालच बाबासाहेब मनोहर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अजितदादा लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा बोलून दाखवली. नाना पटोले यांनी गमतीने का होईना पण अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाला हवा दिली, पण महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीच अशी आहे की अजितदादांना महाराष्ट्राचे विद्यमान देवेंद्र फडणवीस सरकार हेच पाच वर्षे चालेल, अशी ग्वाही विधानसभेत द्यावी लागली.



अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजितदादा म्हणाले, कुणी कुणी मला मुख्यमंत्री व्हा. आम्ही पाठिंबा देतो, असे सांगत आहेत, पण तुमच्याकडे १५ – २० टाळकी आणि तुम्ही म्हणे कुणाला तरी मुख्यमंत्री करणार, कसं व्हायचं मुख्यमंत्री?? काही झालं तरी हेच सरकार पुढची पाच वर्षे चालणार आहे. ब्रह्मदेव‌ आला तरी यात काही बदल होणार नाही!!

शक्तीपीठ महामार्गाला विरोधकांनी केवळ नावाला विरोध करू नये विरोधकांनी असाच समृद्धी महामार्गाला विरोध केला होता शेतकऱ्यांनी सातबारा आणून विरोधी आमदारांना दाखवले होते. त्यांना समृद्धी महामार्ग विरोधात आंदोलन करायला लावले होते, पण देवेंद्र फडणवीस सरकारने जमिनीचा मोबदला वाढवून दिल्याबरोबर शेतकरी विरोधकांपासून दूर झाले आणि समृद्धी महामार्ग झालाच. तसंच शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत होणार आहे. त्यामुळे केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोध करण्यात काही अर्थ नाही. विकास कुठला हवेत होत नाही‌. तो जमिनीवरच करावा लागतो, असे अजितदादांनी सुनावले.

Ajit Pawar says, fadnavis government will run for 5 years

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात