Ajit Pawar अजितदादा ना किंग, ना किंगमेकर; नवाब मलिकांच्या दाव्याला दिले परस्पर प्रत्युत्तर!!

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar महायुतीतला तिसरा घटक पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी याच्याकडे निवडणुकीनंतर सत्तेच्या चाव्या येतील. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे किंगमेकर बनतील, असा दावा त्यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांनी केला होता. मात्र अजित पवारांनी ना किंग, ना किंगमेकर, ना स्पॉयलर, असे सांगून मालिकांचा तो दावा फेटाळून लावला. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजितदादांनी सावध भूमिका घेतली. Ajit Pawar No Kingmaker not a king

भाजपचा विरोध असून देखील अजितदादांनी नवाब मलिक यांना शिवाजीनगर मानखुर्द मधून उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपने त्यांचा प्रचार करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे नवाब मलिक भाजपवर चिडले. ते महायुतीत राहून देखील भाजप विरोधी वक्तव्य करण्यात पुन्हा एकदा आघाडीवर आले. या पार्श्वभूमीवरच नवाब मलिक यांनी सत्तेच्या चाव्या निवडणुकीनंतर अजितदादांच्या हातात येतील आणि ते किंगमेकर किंवा महायुतीचे गणित बिघडवणारे ठरतील, असा दावा केला.Ajit Pawar

मात्र, नवाब मलिकांनी जरी भाजप विरोधी वक्तव्ये केली, तरी आपण भाजपला फार दुखावणे परवडणारे नसल्यामुळे अजितदादांनी सावध भूमिका घेत मुलाखत दिली. अजित पवार निवडणुकीनंतर किंग, किंगमेकर, की स्पॉयलर ठरतील??, असा सवाल स्मिता प्रकाश यांनी विचारल्यावर मला किंग, किंगमेकर किंवा स्पॉयलर असल्या चर्चेमध्ये अजिबात दिलचस्पी नाही, असे सांगून अजित पवारांनी महायुतीचे सरकार पुन्हा आणण्यासच आपले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि आपण आणलेल्या विविध लाभकारक योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यातच आपण गुंतलो असल्याचे देखील अजितदादांनी सांगितले. नवाब मलिकांच्या दाव्यापासून त्यांनी अंतर राखले.

Ajit Pawar No Kingmaker not a king

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात