विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचा मुख्यमंत्री करण्यासाठी एवढे उतावीळ झाले आहेत, की ते जवळ जवळ प्रत्येक नेत्याचे नाव “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टरवर लावायला लागले आहेत. पण आता त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे भावी मुख्यमंत्री पोस्टरवरून आले नवसावर आणि “मुख्यमंत्री अजितदादा” लालबाग गणपतीच्या चरण चिठ्ठीवर!! असे घडले आहे. अजित पवारांनी आज सकाळीच लालबाग गणपतीचे दर्शन घेतले. ajit pawar lalbaug ganpati darshan
मुंबईतले अजित पवार समर्थक कार्यकर्ते रणजीत नरूटे यांनी अजित पवार मुख्यमंत्री होवोत, अशी चिट्ठी लालबागच्या गणपतीच्या चरणावर ठेवून नवस बोलला आहे.
आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही मुख्यमंत्रीपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी अतिउतावळे झाले आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार हे सगळे राष्ट्रवादीचे “भावी मुख्यमंत्री” आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही या भावी मुख्यमंत्र्यांची यादी कमी झाली नसून त्यात रोहित पवारांची भरच पडली आहे. कारण पुणे मुंबई रस्त्यावर रोहित पवारांची “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टर्स नुकतीच झळकली होती. याआधी मुंबईतल्या राष्ट्रवादी भवन समोरच अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकली होतीच, पण आता त्यात नवसाची भर पडून अजित पवार आता लालबाग गणपतीच्या चरण चिठ्ठीवर “भावी मुख्यमंत्री” म्हणून आले आहेत.
ही चिठ्ठी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताच भाजपशी जवळीक असलेले मोहित कंबोज यांनी एक ट्विट करून अजितनिष्ठ राष्ट्रवादीला चिमटा काढला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे असेल तर 45 नव्हे 145 आमदारांचे पाठबळ लागते, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले, पण काही वेळातच ते त्यांनी डिलीटही केले.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जुनेच आवाहन केले. मुख्यमंत्री व्हायला 145 आमदारांचे पाठबळ लागते, ते आपल्याकडे नाही. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री पदाची आशा असल्याच्या बातम्या उगाच पसरवू नका, असे अजितदादांनी आपल्याच कार्यकर्त्यांना समजावले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App