विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हेच आहेत. पक्ष वाढीसाठी त्यांनीच कष्ट घेतले आहेत. खुद्द प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हेच त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे सूचक आणि अनुमोदक होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीमध्ये अजित पवारांचा कोणताही वाटा नाही. त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली नव्हती, असा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगात केला. या युक्तिवादात दम नसल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. Ajit pawar has no share in party growth, pawar group
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्याबद्दल निवडणूक आयोगातल्या सुनावणीत आज शरद पवार अजित पवार अथवा सुप्रिया सुळे हे तीनही नेते उपस्थित नव्हते, त्यांच्या ऐवजी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड, तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजारपणाबाबत दिली महत्त्वाची अपडेट,म्हणाले…
शरद पवार गटाकडून प्रत्यक्ष सुनावणी गेल्या तीन वेळेला अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला होता, पण त्यावेळी पवार गटाकडून देवदत्त कामात यांनी युक्तिवाद केला. 1999 ते 2018 या कालावधीत कोणीच शरद पवारांनी विरुद्ध तक्रार केली नाही पण 2023 मध्ये तक्रारी सुरू झाल्या.
पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे सूचक अनुमोदक होते पक्षाध्यक्ष पदासाठी शरद पवार हे एकमेव उमेदवार होते त्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी तक्रार केली नव्हती याकडे देवदत्त कामात यांनी लक्ष वेधले.
शरद पवार गटाच्या युक्तिवादानंतर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांच्या युक्तिवादात कोणताही दम नाही. त्यामुळे ते परत परत जुनेच मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यापलीकडे कोणताही कायदेशीर आधार त्यांच्याकडे नाही. त्यांच्या केस मध्ये दम नाही. त्यांचे ज्येष्ठ वकील आज निघून गेले होते. शरद पवार गट वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप तटकरे यांनी केला. सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वीच दिलेल्या निकालांमधील कायदेशीर आधार अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने आहे. युक्तिवादाची आमची वेळ आली की निवडणूक आयोगात हा कायदेशीर आधार आम्ही मांडू, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App