नाशिक : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुटल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांना अर्थ खाते मिळाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सह उरलेल्या विरोधी आमदारांसाठी अजितदादा आता शिंदे – फडणवीस सरकार मधले “बफर” झाले आहेत. शिंदे – फडणवीसांपुढे आपली डाळ शिजत नाही हे पाहून काँग्रेस सह उरलेल्या विरोधी पक्षांचे बहुसंख्य आमदार आपल्या मागण्या अजितदादांच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहेत. शिंदे – फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली अजितदादाही आपल्या परीने विरोधी आमदारांचे समाधान करत आहेत. Ajit pawar has become buffer for remaining opposition mlas for their demands in shinde fadnavis government
अजितदादा आत्तापर्यंतच्या विविध मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते असायचे. ते आता शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकाचे नेते झाले आहेत. भले मराठी माध्यमांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा चालवली असली तरी अजितदादांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या मंत्रीपदाची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अजितदादांनी सुमारे 45000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करताना राज्यातल्या सर्व आमदारांना विशिष्ट निधी वाटला. या निधी वाटपावर शिंदे – फडणवीस यांचे नियंत्रण असल्याचे स्पष्ट दिसते.
निधी वाटपात समतोल राखावा लागला
ठाकरे सरकारमध्ये असताना अजितदादांनी पक्षपात करून फक्त राष्ट्रवादीचे आमदारांना 54 % निधी दिला. काँग्रेसचे आमदारांना 42 % आणि शिवसेना आमदारांना 16 % निधी दिला असल्याचा आरोप झाला होता. तशी आकडेवारी एबीपी माझा ने प्रसिद्ध केली होती. पण आता 45000 कोटी रुपयांची रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करताना अजितदादांनी निधी वाटप करताना समतोल राखला किंबहुना तो राखावा लागला, असे बोलले जात आहे.
त्यातही काँग्रेस सह उरलेले सर्व विरोधी पक्षांचे आमदार अजित दादांकडे वेगवेगळ्या मागण्यांसाठी पुरवा करत आहेत. अजितदादा अर्थमंत्री म्हणून त्यांच्यासाठी “बफर” ठरले आहेत. बाळासाहेब थोरात ते यशोमती ठाकूर आणि जयंत पाटील यांना देखील अजितदादांनी निधी वाटपात पुरेसा निधी दिला आहे. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे विरोधी पक्षांचे बाकीचे आमदारही निधीसाठी अजितदादांकडेच पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आपल्या पदरात पडेल, याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात रोहित पवारांचा देखील समावेश आहे.
शरदनिष्ठ गटाचा अजितदादांकडे प्रवास
शिंदे – फडणवीस सरकार मध्ये आपली डाळ शिजत नाही. काँग्रेस – राष्ट्रवादी अथवा ठाकरे – पवार राजवटीत ज्या पद्धतीने मनमानी पद्धतीने निधी खेचून घेता येत होता, तसा शिंदे – फडणवीस सरकारमध्ये निधी खेचून घेता येत नाही, याची जाणीव आता काँग्रेस सह उरलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाच्या आमदारांना झाली आहे. त्यांच्यासाठी अजितदादा मात्र “बफर” ठरले आहेत. निवडणूक वर्षात सर्वांनाच निधी हवा आहे आणि तो अजितदादा देऊ शकतात म्हणून राष्ट्रवादीच्या शरदनिष्ठ गटाचे आमदारही अजितदादांच्या दिशेनेच प्रवास करू लागले आहेत. कारण त्यांना दुसरा पर्याय उरलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App