‘कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कुठल्याही मोठ्या पुढाऱ्याचा असो. आम्हाला काही घेणं देणं नाही.’ असंही म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
वसमत : ‘महिलांवर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे. त्याला माफी कुठल्याही परिस्थित नाही. दोषी कुणीही असो त्याला आम्ही सोडणार नाही.’ असा कडक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी वसमत येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिला.
तसचे, ‘कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कुठल्याही मोठ्या पुढाऱ्याचा असो. आम्हाला काही घेणं देणं नाही. सरकारं येतील जातील परंतु महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम आम्ही करणार.’ असं ते म्हणाले.
याचबरोबर ‘आज समाजात विविध घटना घडत आहेत. आज भारतीय न्याय संहितेतील तरतुदीमुळे आता महिलांना घर बसल्या, ई तक्रार करता येणार आहे. नवीन प्रकरणात अशा प्रकारच्या दोषींना फाशी आणि जन्मठेपेची तरतूद करण्यात आलेली आहे. कारण,त्यांची लायकीच ती आहे. नराधम आहेत, विकृत आहेत. असली माणसं समाजात नसावीत. सगळ्यांनाच जगण्याचा अधिकार आहे. त्या माय-माऊलीला पण आहे, त्या आमच्या मुलीलापण आहे.’ असं अजित पवारांनी सांगितले.
याशिवाय, ‘आधी लवकर एफआयआऱ नोंद होत नव्हत्या, वेळ लागायचा. बदलापूरला आपण बघितलं, अडचणी येत होत्या. मात्र आता शाळा, रुग्णालय, पोलिस ठाणे यांनी कोणत्याही पातळीवर हयगय केली तर त्यांना सोडणार नाही. त्यांनी त्यामध्ये माणुसकीच्या दृष्टिकोनातूनच लक्ष घातलं पाहिजे. अजिबात यामध्ये कुणाला माहिती नाही. यासंदर्भात कायदे आता कडक केले आहेत. परत त्याचं असं काही करण्याचं धाडसच नाही झालं पाहिजे, अशी पिल्लावळ त्याच्याशिवाय गप्प बसणार नाही.’ अशा शब्दांत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App