विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीला तीव्र विरोध करत असताना दुसरीकडे त्यांच्याच भाजप पक्षाच्या पाठिंब्यावर अजित पवारांनी घराणेशाहीला पसंती दिली आणि विदर्भातल्या आमदाराच्या पतीला विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. Ajit Pawar
विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जी एकच जागा आली, त्या जागेवर अजितदादांनी अमरावतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांची उमेदवारी जाहीर केली. विधान परिषदेतले पाच आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक होत असताना आज संबंधित निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्याआधी उमेदवार जाहीर करणे भाग होते म्हणून अजित पवारांनी शेवटच्या दिवशी घराणेशाहीला पसंती देत आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांची उमेदवारी जाहीर केली.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेचे उमेदवारी मिळवण्यासाठी खूप मोठी स्पर्धा लागली होती. सुमारे 100 नेत्यांनी त्यासाठी अर्ज केले होते. पण त्यामधून माध्यमांनी निवडक हेवीवेट नावे चालवली होती. विशेषत: अजितदादा मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्रातून उमेदवारी देतील अशा अटकळी माध्यमांनी बांधल्या होत्या. त्यामुळे झिशान सिद्दिकी, संजय दौंड, उमेश पाटील, संजय शिंदे, दीपक मानकर, संग्राम कोते पाटील यांची नावे माध्यमांनी आघाडीवर ठेवली होती, पण प्रत्यक्षात अजितदादांनी पश्चिम विदर्भात घराणेशाहीला पसंती देत संजय खोडके यांची उमेदवारी जाहीर केली.
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असून भाजपचे तीन उमेदवार अजित पवारांचा एक उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांचा एक उमेदवार असे पाच जण आमदार होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी खानदेशातून चंद्रकांत रघुवंशी यांना पसंती देत त्यांची उमेदवारी जाहीर केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App