विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार बारामती जवळ विमान अपघातात कालवश झाले. सकाळी 8.45 वाजता झालेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला जबर धक्का बसला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तब्बल 40 वर्षे राजकीय मुशाफिरी करणारा नेता विमान अपघातात अचानक कालवश झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळ देखील शोकात बुडाले.Ajit Pawar dies in plane crash near Baramati; Shock to entire Maharashtra!!, six people lost their lives!!
राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दिवसभर आज बारामतीच्या परिसरात जाहीर सभा होणार होत्या. या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीकडे विमानाने आले होते. परंतु सकाळी 8.45 च्या सुमारास बारामती विमानतळा जवळच ते विमान कोसळले आणि जळून खाक झाले. विमानात अजित पवार यांच्यासह सहा जण होते. या सगळ्यांना काळाने हिरावून नेले.
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर फार मोठी छाप पाडली होती. सुरुवातीला काका शरद पवार यांच्या छत्रछायेखाली जरी ते वाढले तरी त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले होते. उत्तम संघटना कौशल्य आणि काम करण्याचा झपाटा ही अजित पवारांची वैशिष्ट्ये होती. आपल्या परखड स्वभावामुळे आणि कार्यशैलीमुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. हे काम होईल ते होईलच आणि जे होणार नाही ते होणार नाही असे सांगण्याची त्यांची धमक होती आणि त्या पद्धतीनेच ते राजकीय दृष्ट्या वर्तणूक करत होते.
– 1991 मध्ये राजकीय कारकीर्दीला सुरुवात
अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा बारामतीतून खासदार झाले. परंतु, शरद पवार संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेल्यानंतर त्यांनी बारामतीची लोकसभेची जागा त्यांच्यासाठी सोडली आणि ते बारामतीतूनच पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर राज्यामध्ये जलसंपदा, सह अनेक खात्यांचे ते मंत्री झाले. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा ते उपमुख्यमंत्री होते.
– सहा वेळा उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी अजित पवारांना भाजपबरोबर सरकारमध्ये सामील व्हायचे होते परंतु शरद पवारांनी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यापासून केले त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय मतभेदाला सुरुवात झाली. परंतु, सुरुवातीच्या काही काळ दोघांनीही संयमाने परिस्थिती हाताळली. पण ज्यावेळी शरद पवारांच्या राजकीय वारसाची वेळ आली. त्यावेळी मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडे तो वारसा जाईल हे लक्षात येताच अजित पवार यांनी बंडाचे निशाण उभारले. मी केवळ कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून तुम्ही मला डावलता का??, असे म्हणत अजित पवारांनी स्वतंत्रपणे भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा अजित पवारांना त्यासाठी मान्यता दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना आपल्या मंत्रिमंडळात दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून समाविष्ट केले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. कारण त्यांनी पक्ष फोडून भाजपा बरोबर न येता, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस घेऊनच ते भाजपा बरोबर आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App