विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप आणि अजित पवार पाठीत सुरा खुपसत आहेत हे वक्तव्य यामुळे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अजित पवार प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यांनी मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पटोले यांची तक्रार केली आहे.Ajit Pawar complains about Nana Patole to CM, angry over allegations of surveillance
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यावर संतप्त प्रकिक्रिया व्यक्त करताना अजित पवार यांनी पटोले यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे संताप व्यक्त केला आहे. आरोपांमुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केली.
नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरू आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे.
मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत.
यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले. मी रात्री ३ वाजता दोऱ्यावर निघालो ते देखील त्यांना तेव्हाच माहिती होते, असा आरोप त्यांनी केला होता.अजित पवार हे पालकमंत्री म्हणून पुणे जिल्ह्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत. सोबत राहूनही पाठीत सुरू खुपसण्याचे काम करत आहेत, असे पटोले म्हणाले होते. त्यामुळे अजित पवार संतप्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App