केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती
विशेष प्रतनिधी
मुंबई : अमरावतीकरांची गगनभरारी घेण्याची स्वप्नपूर्ती दृष्टीक्षेपात असून हवाई प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. अमरावती विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (DGCA) एअरोड्रोम परवाना मिळाला असून, लवकरच अमरावतीतून देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार आहेत. अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार Airline service राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे पश्चिम विदर्भातील जनतेचे स्वप्न पूर्ण होत आहे. मार्च २०२५ च्या अखेरीस अमरावती विमानतळावरून विमान वाहतूक सुरू होणार असून, व्यवसाय, पर्यटन, उद्योग आणि दळणवळणाला मोठी चालना मिळेल तसेच संपूर्ण विदर्भाच्या विकासाला नवी गती मिळेल. असं मोहोळ म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पाठपुरावा आणि प्रयत्न यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. हवाई उड्डाणाची परवानगी लवकरात लवकर मिळावी, यासाठी आपण नवी दिल्ली येथे बैठक घेऊन तांत्रिक बाजू तपासून परवानगी देण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या ,शिवाय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित देण्याचे निर्देश दिले होते. अशी माहिती देखील मोहोळ यांनी दिली.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वात देशभरात विमानतळांचे जाळे विस्तारत आहे. हवाई प्रवास सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्याच्या दृष्टीने सरकार अनेक महत्त्वपूर्ण धोरणे राबवत आहे, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला हवाई प्रवासाची संधी मिळत आहे. अमरावतीकरांचे मनःपूर्वक अभिनंदन! असं मंत्री मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App