असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षाला 100 + जागा, ओळखा पुढचा धोका; नुसत्या टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडणाऱ्यांना इशारा!!

AIMIM

नाशिक : असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षाला 100 + जागा, ओळखा पुढचा धोका; नुसत्या टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडणाऱ्यांना इशारा!!, हे महाराष्ट्रातले वेगळे राजकीय वास्तव 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालांनंतर पुढे आले. या निकालामुळे अनेकांनी महाराष्ट्रात मुसलमानांचा राजकीय प्रभाव वाढल्याची भीती व्यक्त केली. पण यामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांकडून मुसलमान दूर गेले हे राजकीय वास्तव फारसे कुणी स्वीकारले नाही. काँग्रेस, उबाठा शिवसेना या दोन पक्षांना मुसलमान मतदारांनी जोरदार फटका दिला.AIMIM win threat to so called secular parties

पण त्या पलीकडे जाऊन AIMIM पक्षाच्या यशाचा सरळ अर्थ असा, की मुसलमानांनी त्यांना हवा तो त्यांच्या नावाचा पक्ष निवडला. केवळ टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडणाऱ्या आणि मुसलमानांच्या खऱ्या हिताकडे दुर्लक्ष करणारे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना मुसलमानांनी नाकारले. कारण ओवैसींच्या AIMIM पक्षाला जेवढ्या 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तेवढ्या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, वंचित बहुजन आघाडीला, मनसेला, कम्युनिस्ट पार्टीला, शेतकरी कामगार पक्षाला आणि अन्य पक्षांना सुद्धा मिळवता आल्या नाहीत.



– पवारांच्या राष्ट्रवादी वर भारी

शरद पवारांच्या राष्ट्रवादी सकट वर उल्लेख केलेल्या पक्षांनी फक्त टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडण्यात धन्यता मानली. आपण मुसलमानांच्या इफ्तार पार्ट्यांमध्ये गेलो, त्यांच्याबरोबर जेवलो, की मुसलमान आपल्या मागे येतात. त्यांना आपल्या पक्षाला मते देण्यापासून पर्याय उरत नाही, असा शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या त्यांच्या चेल्या चपाट्यांचा समज होता. पण मुसलमान मतदारांनी तो धुळीस मिळवला. मुसलमान मतदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून दूर गेले. हे आकडेवारीने सिद्ध केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 22 महापालिकांमध्ये 0 जागा मिळाल्या. इतरत्र मिळून फक्त 36 जागांवर समाधान मानावे लागले. हे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड या सगळ्यांचे अपयश ठरले.

– आंबेडकरांच्या वंचितला फटका

एकेकाळी असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाची प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने युती करून निवडणुका लढवल्या होत्या त्याचे निकाल पाहून प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा AIMIM ला फायदा झाला. पण वंचित बहुजन आघाडीला त्यांचा तोटा झाला, असे म्हटले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी ओवैसी यांच्याशी फारकत घेतली होती. पण वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम मतदार घटकाला AIMIM ने व्यवस्थित पकडून ठेवले. तो मुस्लिम मतदार घटक वंचित बहुजन आघाडी पासून दूर गेला. त्याचा फटका वंचितला बसला. वंचित बहुजन आघाडीच्या पदरात फक्त 15 नगरसेवक पडले.

– भाजप पुढे खरे आव्हान

इथून पुढच्या भविष्यात मुसलमान मतदारांना आणि AIMIM पक्षाला तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांची गरज नाही मुस्लिम मतदार आणि AIMIM पक्ष स्वतःचे भवितव्य स्वतः ठरवतील. ते महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वीण उसवून तिच्यात घुसखोरी करायचा डाव खेळतील. त्यांचा खरा बंदोबस्त करणे हे सत्ताधारी भाजपसाठी नव्याने उभे राहिलेले आव्हान असेल.

AIMIM win threat to so called secular parties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात