अहमदनगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड आयसीयू वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कोरोना वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी सांगितले की, कोविड वॉर्डमध्ये आग लागल्यानंतर रुग्ण मदतीसाठी ओरडत होते, तेव्हा रुग्णालयातील कर्मचारी बाहेर चहा-नाश्ता करण्यात मश्गुल होते. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीयू वॉर्डमधील संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी चहा-नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले होते. आगीच्या वेळी वॉर्ड प्रभारीदेखील ड्यूटीवर आले नव्हते, त्यांनी कोणालाही त्यांच्या अनुपस्थितीची माहिती दिली नव्हती. Ahmednagar hospital fire investigation patients were screaming When fire in the covid ward But staff Gone on breakfast
वृत्तसंस्था
अहमदनगर : अहमदनगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड आयसीयू वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कोरोना वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी सांगितले की, कोविड वॉर्डमध्ये आग लागल्यानंतर रुग्ण मदतीसाठी ओरडत होते, तेव्हा रुग्णालयातील कर्मचारी बाहेर चहा-नाश्ता करण्यात मश्गुल होते. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीयू वॉर्डमधील संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी चहा-नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले होते. आगीच्या वेळी वॉर्ड प्रभारीदेखील ड्यूटीवर आले नव्हते, त्यांनी कोणालाही त्यांच्या अनुपस्थितीची माहिती दिली नव्हती.
आग लागल्यानंतर रुग्णालयात दाखल रुग्णांना अन्य ठिकाणी हलवावे लागल्याचे तपासात समोर आले आहे. यादरम्यान हॉस्पिटलमध्ये ठेवलेले अग्निशमन यंत्र आग विझविण्यात अपयशी ठरल्याने आग आणखी वाढली होती. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी आयसीयू वॉर्डमध्ये २० जण होते. आयसीयूमध्येही अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ज्या वॉर्डमध्ये आग लागली तो वॉर्ड हॉस्पिटलच्या अगदी मधोमध आहे, त्यामुळे बचाव कार्यातही खूप अडचणी आल्या.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना विवेक खाटिक यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनाही कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. त्याने सांगितले की, त्या दिवशी त्याच्या 65 वर्षीय वडिलांनी त्याला टेबल फॅन लावण्यास सांगितले होते. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा आग लागली होती आणि सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. वॉर्डात प्रवेश करताच त्याला आईचा ओरडण्याचा आवाज आला. विवेकने आधी आईला तेथून बाहेर काढले आणि नंतर वडिलांना खांद्यावर घेऊन 200 मीटर अंतरावर असलेल्या जुन्या इमारतीतील दुसऱ्या वॉर्डात नेले, तिथे वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.
अहमदनगरचे एसपी मनोज पाटील यांनी सांगितले की, आग लागली तेव्हा चारही कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते आणि सर्वजण बाहेर चहा-नाश्ता करत होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. एसपी मनोज पाटील यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी थांबून लोकांना मदत केली असती तर जास्तीत जास्त जीव वाचू शकले असते.
या दुर्घटनेचा तपास अहवाल समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सध्या पोलिसांनी कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुरावे सापडल्यास संबंधित लोकांना अटकही होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App