विशेष प्रतिनिधी
नाशिक : Agriculture Minister Kokate शेतकऱ्यांना अनेक योजनांचे अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारकडून अनुदान कधी मिळणार? याची वाट शेतकरी पाहत आहेत. यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही, अशी खदखद कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली. अजित पवारांनी काही तरतूद केली, तर पुढील आठवड्यात अनुदान दिले जाईल, असेही ते म्हणाले.Agriculture Minister Kokate
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले. शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही आपले मत मांडले.
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे अनुदान आहेत, पण ते मिळत नाही. केंद्राकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही. अजितदादांनी काही तरतूद केली, तर पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना देणार आहे. पर्वा अजित पवार यांच्यासोबत बैठक असणार आहे, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल
पुढे बोलताना माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठीच्या अजित पोर्टलबाबत माहिती सांगितली. आम्ही शेती विभागात सुरळीतपणा आणि पारदर्शकपणा आणण्यासाठी प्रयत्न करत असून शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार आहे. हे पोर्टल आयआयटीचे विद्यार्थी तयार करत आहेत. लवकरच ते लॉन्च केले जाईल, असे कोकाटे यांनी सांगितले.
भुजबळांनी पक्ष नेतृत्वावर टीका टिपणी करू नये
माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही भाष्य केले. भुजबळांच्या नाराजीवर भाष्य करायचे मी बंद केले आहे. त्यांच्याबाबती वरीष्ठ पातळीवर निर्णय होतील, असे ते म्हणाले. भुजबळांनी पक्ष नेतृत्वावर टीका टिपणी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळांना सल्ला दिला.
नंदुरबारमध्ये आदिवासींच्या हिताचे निर्णय घेणार
माणिकराव कोकाटे यांच्या नंदूरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याविषयी त्यांना विचारले असता, नंदुरबारला मी याआधी नंदुरबारला कधीच गेलो नाही, त्यामुळे तेथील समस्या काय आहे याबाबत माहिती नाही. पालकमंत्री पद मिळाल्याने समस्या समजून घेऊन सोडवणार असून आदिवासींच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App