विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याच्या राजकारणातील कट्टर वैरी समजले जाणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.After Udayan Raje, Harshvardhan Patil, Ajit Pawar started meeting his arch enemies
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात हे दोन्ही नेते एकत्र आले होते. राजकारणातील कट्टर शत्रू म्हणून पवार आणि पाटील ओळखले जातात. त्यांच्यात जवळपास वीस ते बावीस मिनिटे चर्चा झाली.
अजित पवार व एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीच्या सरकारमध्ये १५ वर्षे एकत्र काम केले. मात्र, दोघांच्यात राजकीय वैर होते. हर्षवर्धन पाटील यांचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा अजित पवार यांचा नेहमीच प्रयत्न असे. . ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विरोध असतानाही दत्तात्रय भरणे यांना २००९ साली बंडखोरी करण्यास भाग पाडले.
या नंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दोन वेळा विधानसभेला विजयी करण्यामध्ये अजित पवारांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, एकेकाळी आघाडी सरकार मध्ये काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते म्हणून असलेले हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा घरचा रस्ता दाखविण्यात अजित पवार यशस्वी ठरले आहे, हर्षवर्धन पाटील यांनीदेखील मी थेट अजित पवारांचा विरोधक असल्याचा जाहीर कार्यक्रमांमधून अनेक वेळा सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App