प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झालेल्या टिळक सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमामुळे शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसची देखील राजकीय कोंडी झाली आहे. कारण एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार देण्याच्या समारंभात व्यासपीठावर असणार आहेत, तर दुसरीकडे पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांनी मात्र मोदींना टिळक पुरस्कार जाहीर केल्याबद्दल रोहित टिळकांविरुद्ध काँग्रेस श्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. After NCP, Congress is also in dilemma
या कार्यक्रमामुळे शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या दोघांचीही राजकीय कोंडी झाली आहे. पुणे शहर महाविकास आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यात येऊन लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्या ऐवजी मणिपूरमध्ये जाऊन तिथल्या जनतेचे गाऱ्हाणे ऐकून अश्रू पुसायचे आवाहन केले आहे.
एकीकडे 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार समारंभात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघेही व्यासपीठावर असणार आहेत आणि त्या दोघांच्या पक्षांचे स्थानिक नेते मात्र मोदींविरुद्ध टिळक चौकात निदर्शने करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार दिल्याबद्दल जाहीर केल्याबद्दल पुण्यातल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी रोहित टिळक यांच्याविरुद्ध काँग्रेस श्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन काँग्रेस श्रेष्ठींनी रोहित टिळकांवर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे.
पण त्याचवेळी टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात सुशील कुमार शिंदे यांच्यासारखे वरिष्ठ नेते त्याच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत, याकडे मात्र शहर काँग्रेसने काणाडोळा केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more