
विशेष प्रतिनिधी
नागपूर : बऱ्याच दिवसांनी “त्यांची” बातमी आली; नागपुरात सत्ताधारी बाकांवर नवाब मलिक बसले शेवटी!!, असे चित्र महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आज दिसले.After many days came the news of “them”; Nawab Malik finally sat on the ruling bench in Nagpur!!
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक शरद पवारांच्या गोटात की अजित पवारांच्या गोटात??, हा सवाल दोन्ही गटांना बरेच दिवस भेडसावत होता. दोन्ही गटांचे नेते नवाब मलिकांना मुंबईतल्या निवासस्थानी भेटून आले होते. तब्बल 18 महिने तुरुंगात राहिल्यानंतर नवाब मलिक विश्रांती घेत आपल्या घरात बसून होते, पण नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने नवाब मलिकांचे कार्ड पुन्हा ऍक्टिव्हेट झाले आणि ते कार्ड ऍक्टिव्हेट होताना नवाब मलिक हळूच विधानसभेत सत्ताधारी बाकांवर शेवटच्या रांगेत बसलेले दिसले.
हे तेच नवाब मलिक आहेत, ज्यांच्या बातम्या वर्ष दीड वर्षांपूर्वी पर्यंत संजय राऊत यांच्या खालोखाल माध्यमांमध्ये झळकत होत्या. त्यांचे बाईट सतत टीव्हीवर येत होते. संजय राऊत जशी रोज पत्रकार परिषद घेतात, तशी नवाब मलिक अखंड राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून रोज पत्रकार परिषद घ्यायचे. भाजपवर टीकेच्या तोफा डागायचे. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात अखंड राहणार असल्याची भाषा वापरायचे. नवाब मलिक अत्यंत आक्रमक नेते आहेत. ते राष्ट्रवादीची बाजू माध्यमांमध्ये मजबुतीने पेलतात, असे चित्र माध्यमे रंगवत होती.
पण दीड एक वर्षांपूर्वी हे सगळे चित्र फिरले. महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि नवाब मलिकांची पापे उदयाला आली. नवाब मलिकांनी दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रीग करून कुर्ल्यातली जी जमीन हडप केली, ते प्रकरण कोर्टात पोहोचले. नवाब मलिकांना तुरुंगवास भोगावा लागला. नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या विकारांसाठी उपचार सुरू आहेत. पण 18 महिने तुरुंगात राहिल्यानंतर नवाब मलिकांमध्ये “बराच बदल” घडला. “तो बदल” रोजच्या पत्रकार परिषदांमध्ये दिसत नव्हता, कारण ते पत्रकार परिषदाच घेत नव्हते. त्या बंद होत्या.
आज नागपूर अधिवेशनात मात्र नवाब मलिक आले. त्यांना तिथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भेटले दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर शेवटच्या रांगेत जाऊन बसले. याचा अर्थ ते अजित पवारांच्या गोटात आल्याचे मानले जात आहे. 18 महिन्यांच्या तुरुंगवासानंतर नवाब मलिकांमध्ये नेमका काय बदल झाला??, हे चित्र शेवटच्या बाकांवर वर दिसले.
After many days came the news of “them”; Nawab Malik finally sat on the ruling bench in Nagpur!!
महत्वाच्या बातम्या
- काय सांगता! सूर्याला पडले 60 पृथ्वी मावतील एवढे छिद्र; वेगवान सौर वाऱ्यांमुळे रेडिओ कम्युनिकेशन ठप्प होण्याचा इशारा
- I.N.D.I.A ची बैठक खरगेंच्या घरी संपन्न; नितीश, स्टॅलिन आणि अखिलेश अनुपस्थित, ममता म्हणाल्या- 7 दिवसांपूर्वी सांगायला हवे होते
- मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नईत विध्वंस; 72 तास वीज गुल, इंटरनेट बंद; हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पोहोचवले अन्न
- अमित शहांनी लोकसभेत नेहरूंचे पत्रच वाचून दाखवले; म्हणाले- नेहरूंनीच शेख अब्दुल्लांना सांगितले होते, काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे चूक होती