शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.After defeating Valse Patil Corona, I am sure that I will join the service soon – Subhash Desai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यातील सर्व व्यवहार हळूहळू खुले होत असतानाच, राज्य सरकारची चिंता वाढवणाऱ्या आता कोरोनाच्या पुन्हा बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
वळसे पाटील यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली. कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्यानं मी माझी टेस्ट केली असून माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे गृहमंत्री, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मा. दिलीप वळसे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कोरोनावर मात करून आपण लवकरात लवकर सेवेत पुन्हा रुजू व्हाल, याची खात्री आहे. आपणांस उत्तम स्वास्थ्यासह दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!’ असे ट्विट सुभाष देसाई यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App