शालेय विद्यार्थ्यांना सुपरमाईंड फाऊंडेशनतर्फे मोफत मार्गदर्शन


करोनाच्या काळात ऑनलाईन शाळा सुरु झाल्या, गेले दोन वर्षे मोबाईल, लॅपटॉप वर शाळा केल्यानंतर आता प्रत्यक्ष शाळेत जाताना मुले व पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांची ही आव्हाने सोपी करण्यासाठी ’सुपरमाईंड फाऊंडेशनच्या वतीने मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे -करोनाच्या काळात ऑनलाईन शाळा सुरु झाल्या, गेले दोन वर्षे मोबाईल, लॅपटॉप वर शाळा केल्यानंतर आता प्रत्यक्ष शाळेत जाताना मुले व पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांची ही आव्हाने सोपी करण्यासाठी ’सुपरमाईंड फाऊंडेशनच्या वतीने मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 12 आणि 4 ते 7 यावेळेत विद्यार्थी व पालकांना विनामूल्य वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात झाली असून यात संभाषण, वाचन, लेखन व श्रावण या कौशल्यांसह विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी ’टिप्स’ विद्यार्थ्यांना देण्यावर भर असणार असल्याचे संस्थेच्या अश्विनी भालेकर व अनुजा करवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.After corona period to many challenges in the front of students now supermind foundation will help this student

मार्गदर्शन पुण्यातील शास्त्री रस्त्यावरील नवी पेठ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात करण्यात येईल. मार्गदर्शन मर्यादित कालावधीसाठी असल्याने इच्छुकांनी ९०४९९९२८०७/८/९ या क्रमांकावर किंवा www.supermindstudy.com या संकेतस्थळावर संपर्क साधून पूर्व नियोजित वेळ घेणे आवश्यक आहे.यावेळी भालेकर म्हणाल्या, दोन वर्षात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान, शाळेशी, शिक्षकांशी संपर्क, संवाद नसल्याने विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर झालेले विपरीत परिणाम, लिखाणाच्या सर्वच अभाव, शिक्षणातील अभ्यासातील कमी झालेले स्वारस्य, परीक्षेची सवय नाही आदी अनेक आव्हाने आज पालक व विद्यार्थ्यांसमोर असल्याने अशा सर्व गोष्टींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच अभ्यासातील आव्हानांवर योग्य उपयोजन करणे तसेच शिक्षणाबाबत, अभ्यासाबाबत गांभीर्य व सजगता निर्माण करणे व अभ्यासातील स्वारस्य वाढवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे हेच या मार्गदर्शन सत्राचे उद्दिष्ट आहे असेही त्यांनी सांगितले.

After corona period to many challenges in the front of students now supermind foundation will help this student

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात