प्रतिनिधी
नाशिक : अफगाणी नागरिक, भारतातला निर्वासित सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती उर्फ सुफीबाबा हत्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, एक जण सुफीबाबाचा वाहन चालक असून दुसरा सहकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मूळचा अफगाणिस्तानचा नागरिक असलेला सुफी ख्वाजा हा दीड वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आला होता. अवघ्या दीड वर्षात त्याने नाशिक जिल्ह्यात कोट्यवधीची संपत्ती जमवली होती, मात्र ही सर्व संपत्ती त्यांच्या नावावर होत नसल्यामुळे त्याने इतरांच्या नावावर केली आहे. संपत्तीच्या वादातून सुफी बाबा याच्यावर चालक आणि सहकार्याने गोळ्या झाडून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुफीबाबाच्या हत्येमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचा नेमका स्त्रोत काय सुफीबाबाने नेमका कुठे जमीन जुमला घेतला होता??, ही माया त्याने कशी जमवली?? हे सगळे गुढ आहे आणि हे गुढ पोलीस सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. Afghani Sufi Baba from Yeola in Nashik district in 1.5 years
आरोपींपैकी एक सुफीबाबाचा चालक
नाशिक जिल्ह्यातील येवला एमआयडीसी परिसरात एका जमिनीची पूजा करण्यासाठी जायचे असल्याचे सांगून मंगळवारी सायंकाळी सुफीबाबा याला एमआयडीसी परिसरात आणण्यात आले होते. त्या ठिकाणी सुफी ख्याजा उर्फ सुफीबाबा याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, हत्येनंतर मारेकऱ्यांनी सुफीबाबाच्या मोटारीसह तेथून पळ काढला होता. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून येवला पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत दोन संशयितांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेले दोघांपैकी एक जण सुफीबाबा याच्या वाहनावरील चालक असून दुसरा त्याचा सहकारी असल्याची माहिती पाटील यांनी दिली. प्राथमिक चौकशीवरून ही हत्या संपत्तीच्या वादातून झाली असल्याची दाट शक्यता आहे, मात्र सुफी बाबाच्या सर्व संपत्तीच्या अनुषंगाने आणि त्याच्या दीड वर्षातल्या सर्व व्यवहारांच्या संदर्भात आम्हीच पोलीस सर्वांगीण तपास करीत असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
– सुफीबाबाला अफगाणिस्तानातून हाकलेले
सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती उर्फ सुफी बाबा हा मुस्लिम धर्मगुरू होता, मूळचा अफगाण देशाचा नागरिक असून दीड वर्षांपूर्वी त्याला अफगाणिस्तानातून हाकलले होते. तेथून तो भारतात आश्रयाला आला होता. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे राहत होता, सुफी ख्वाजा याला येवल्यात सुफीबाबा म्हणून ओळखले जात आहे. पूजा पाठ करणे, मुस्लिम धर्मियांना प्रवचन देणे यासारखे कामे सुफीबाबा करीत होता, त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून त्यातून त्याला मोठ्या देणग्या मिळत होत्या. मात्र तो निर्वासित आसल्यामुळे त्याचे कुठल्याही बँकेत खाते नव्हते. तो दुसऱ्यांच्या बँक खात्यावर देणग्या मागवत होता, त्या पैशातून त्याने केवळ दीड वर्षात नाशिक जिल्ह्यात अफाट संपत्ती जमा केली होती, मात्र त्या जमिनी, वाहने त्याने दुसऱ्याच्या नावावर खरेदी केली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांच्या नावावर सुफीबाबा याने जमिनी घेतल्या होत्या, तसेच त्यांच्या बँक खात्यावर मोठा देणग्या मागवल्या होत्या. हत्येमागे संपत्ती हे एक कारण असू शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर या संदर्भातील इतर काही धागेदोरे हाती लागतात का??, याबाबतही पोलीस असून तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App