महाविकास आघाडीचे ठाकरे पवार सरकार सत्तेबाहेर गेल्यानंतर शिवसेनेला लागलेली मोठी गळती रोखण्यासाठी आणि गळतीमुळे तयार झालेले खिंडार बुजवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेचा सिमेंटिंग फोर्स वापरायचे ठरवले आहे. Adity Thackeray to launch Nistha Yatra all over maharashtra first yatra from Mumbai
क्लस्टर बॉम्ब फुटला
आदित्य ठाकरे हे मुंबईतील बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघापासून निष्ठा यात्रेची सुरुवात करणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने ती यात्रा मुंबई बाहेर देखील नेणार आहेत. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर फुटीचा क्लस्टर बॉम्ब फुटला आहे. क्लस्टर बॉम्ब वरवरचे नुकसान न करता जमिनीखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असतो. संपूर्ण शहरेच्या शहरे बेचिराख करत असतो. हे क्लस्टर बॉम्बचे वैशिष्ट्य आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड महाराष्ट्रभर पसरण्याचे वैशिष्ट्य ही क्लस्टर बॉम्ब सारखेच आहे. 40 आमदार फुटले 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. ठाणे महापालिकेतले 66 नगरसेवक फुटलेत. नवी मुंबई पुणे संभाजीनगर यासारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्येही मोठे सुरुंग लागलेत. त्यामुळे दररोज एकापाठोपाठ एक शिवसेनेतल्या फुटीच्या बातम्या येणार आहेत.
Uddhav Thackeray : योगींनी भोंगे उतरवले, पण हे काम हिंदुत्वाचे नाही, तर धर्मनिरपेक्षतेचे!!
– ठाकरे परिवाराकडून मर्यादित प्रत्युत्तर
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिवसेना भवन आतल्या बैठका, प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा, मातोश्री वरचे छोटे मेळावे आणि आता आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा अशी प्रत्युत्तरे देण्यात येत आहेत.
त्यातल्या त्यात आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा हा सर्वात मोठा प्रत्युत्तराचा प्रयत्न मानला पाहिजे. कारण त्याची सुरुवात ते मुंबईतून करणार असून नंतर ते महाराष्ट्रभर पोहोचणार आहेत याचा अर्थ असा शिवसेनेला अधिक गळती लागली. आता खिंडार पडते आहे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सिमेंटिंग फोर्स वापरला जाणार आहे.
– दीर्घकालीन योजना शक्य
आता याकडे फक्त नजीकच्या राजकीय भविष्यात बघून चालणार नाही. दीर्घकालीन राजकारणात आदित्य ठाकरे यांची जर निष्ठा यात्रा यशस्वी झाली तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपले नेतृत्व प्रस्थापित करणारे तिशीच्या वयाचे ते त्या पिढीतले सगळ्यात मोठे नेते ठरणार आहेत. त्या तुलनेत रोहित पवार, आदिती तटकरे, अमित देशमुख, धीरज देशमुख, अमित ठाकरे, नितेश राणे, विश्वजीत कदम या त्यांच्या वयाच्या असणाऱ्या आणि पिढीतल्या असणाऱ्या नेत्यांपेक्षा आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व अधिक प्रबळ ठरणार आहे. अर्थात त्यांची निष्ठा यात्रा मात्र विशिष्ट प्रमाणात यशस्वी होण्याची त्यासाठी पूर्व अट असेल. एकदा ती यशस्वी झाली तर खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व त्यांच्या पिढीतले सर्वात मोठे ठरेल याविषयी शंका नाही. मग शिवसेनेतली विद्यमान गळती रोखली जावो अथवा खिंडारे बुजवली जावोत अथवा न जावोत. आदित्य ठाकरे हे जर राजकीय कन्सिस्टन्सी ठेवून महाराष्ट्रभर निष्ठा यात्रा काढणार असतील तर त्यांचे यश त्यांच्यासाठी सगळ्यात मोठे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App