प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी असल्याने घरातून राज्याचा कारभार चालवत आहेत. विधिमंडळाच्या 5 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आपला कार्यभार ज्येष्ठ मंत्र्याकडे किंवा आपले सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावा, अशा स्वरूपाची मागणी झाली होती परंतु ही मागणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली नाही.Aditya has relieved a lot of my stress
विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर आज व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन त्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये आदित्यने माझा बराच ताण हलका हलका केला आहे, असे राजकीय सूचक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी अनेक राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, की जनतेच्या पैशांवर आपल्या जाहिराती करणे मला मान्य नाही. त्यामुळे आम्ही हे केले आणि मी ते केले असे अनेक राजकीय पक्ष सांगत असले तरी शिवसेनेची ती पद्धत नाही. शिवसैनिक, शिवसेनेचे नगरसेवक हे मध्यरात्रीपर्यंत काम करतात. रस्त्यावर उतरून विकास कामांची पाहणी करतात. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतात. ही पद्धत खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली आहे. ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नालेसफाई सारखी कामे पण बघत असायचे. त्यांच्याकडे पाहूनच मी अनेक गोष्टी शिकत मोठा झालो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, की आज आदित्यने देखील माझा बराच ताण हलका केला आहे. आदित्य देखील शिवसेनेच्या आमदार, खासदारांबरोबर तसेच नगरसेवकांबरोबर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनेक विकास कामे पाहत असतो. त्यांना सूचना करत असतो. त्यांच्याकडून शिकतही असतो. यामुळे शिवसेनाप्रमुखांनी जी परंपरा सुरू केली आहे ती आदित्य वाढवताना दिसतो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या या राजकीय सूचक उद्गारांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे राजकीय वारस आहेत हे उघड आहे. परंतु त्यांनी, “आदित्य माझा ताण हलका करतो”, हे वाक्य उच्चारल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचे वाटप देखील आदित्य यांच्याबरोबर शेअर केले आहे का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजारपणाच्या काळात तरी आपला कार्यभार ज्येष्ठ मंत्र्यांकडे सोपवावा किंवा आदित्य ठाकरे यांना तो द्यावा. त्यांच्यावरही विश्वास नसेल तर पत्नी रश्मी मंत्री करून त्यांच्याकडे पदभार सोपवावा, अशा अनेक सूचना विरोधी पक्ष भाजपने केल्या होत्या. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या ऐकल्या नव्हत्या. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सूचक उद्गारातून मात्र त्यांची पुढची राजकीय चाल काय असेल याचे संकेत मिळत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App