प्रतिनिधी
मुंबई : Adani-Fadnavis उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यात झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. धारावीनंतर गोरेगाव येथील मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले आहे.Adani-Fadnavis
हा संपूर्ण प्रकल्प ३६ हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र, राजकीय वर्तुळातील जाणकार सूत्रांच्या मते, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हेदेखील दोघांमधील भेटीमागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. कारण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी नियोजित होते, त्याचे वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होईल, अशी घोषणा अदानी यांनी रविवारी केली.
उद्योजक गौतम अदानी हे रात्री अकरा वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. मुंबईसह राज्यातील विकास प्रकल्पांबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास अदानी हे सागर बंगल्यातून बाहेर पडल्याचे दिसून आले. जवळपास दीड तास त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे.
36 हजार कोटींचा प्रकल्प अदानींना
डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योजक अदानी यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली होती. राज्यात अदानी यांचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. यात आता नव्या एका प्रकल्पाची भर पडली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पानंतर अदानी समूहाल मुंबईतील आणखी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट 36000 कोटी रुपयांचा आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. अदानी समूहाच्या अदानी प्रॉपर्टीज प्रा.लि. कंपनीला मुंबईतील मोतीलाल नगर I, II,III, गोरेगाव पश्चिम येथील 143 एकरमधील गृहनिर्माण प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम मिळाले आहे. अदानी समूहाने या प्रकल्पासाठी सर्वाधिक 36000 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App