अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकीत जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीनुसार, अदानी यांची संपत्ती 115.4 बिलियन डॉलर (सुमारे 9.2 लाख कोटी) गेली आहे. तर बिल गेट्सची एकूण संपत्ती $ 104.2 बिलियन (सुमारे 8.3 लाख कोटी रुपये) आहे. म्हणजेच दोघांच्या संपत्तीमध्ये सुमारे 11 अब्ज डॉलरचा फरक आहे.
जगातील टॉप टेनमधील श्रीमंत व्यक्ती
1. एलन मस्क 235.8 अब्ज डॉलर 2. बर्नार्ड अर्नाल्ट 155.2 अब्ज डॉलर 3. जेफ बेजोस 148.4 अब्ज डॉलर 4. गौतम अदाणी 115.5 अब्ज डॉलर 5. बिल गेट्स 104.6 अब्ज डॉलर 6. लॅरी एलिसन 99.7 अब्ज डॉलर 7. वॉरेन बफे 99.4 अब्ज डॉलर 8. लॅरी पेज 98.3 अब्ज डॉलर 9. सर्गेई ब्रिन 94.5 अब्ज डॉलर 10. मुकेश अंबानी 89.9 अब्ज डॉलर
आशियातील सर्वात श्रीमंत
4 एप्रिल रोजी अदानी यंदा सेंटीबिलियनेयर्स क्लबमध्ये सहभागी झाले होते. 100 अब्जापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तिंचा यात समावेश होतो. त्याचबरोबर ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झालेली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत. बिझनेस टायकून अदानी आता फक्त 3 लोकांच्या मागे आहे. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क, लुई मस्क, लुई व्हिटॉनचे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस. अदानी समूहाच्या शेअर्सच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे अदानी चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App