सुरुवातीला मास्क घातलेले असल्यामुळे शिल्पा शेट्टी ओळखून आल्या नाहीत.मात्र, मास्क काढल्यावर सर्वत्र शिल्पा शेट्टी गडावर आल्याची माहिती मिळाली. Actress Shilpa Shetty along with her husband Raj Kundra visited Saptashrungi Devi
विशेष प्रतिनिधी
नाशिक : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व पती राज कुंद्रा यांनी मंगळवारी (दि. ४) रोजी दुपारी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. शिल्पा आणि राज कुंद्रा सप्तशृंगीचरणी दर्शनासाठी आले.यावेळी ग्रामपंचायत व सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टकडून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला मास्क घातलेले असल्यामुळे शिल्पा शेट्टी ओळखून आल्या नाहीत.मात्र, मास्क काढल्यावर सर्वत्र शिल्पा शेट्टी गडावर आल्याची माहिती मिळाली. ही माहिती चाहत्यांना समजताच या परिसरात गर्दी झाली.यानंतर पोलिसांना ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.
याआधी पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी राज कुंद्रा गेल्या वर्षी अडचणीत आला होता.त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.यानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना हिमाचल प्रदेशात स्पॉट करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील शत्रुनाशिनी माँ बगलामुखी मंदिर बनखंडी येथे त्यांनी एकत्र पूजा केली. शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत चामुंडा देवी मंदिर आणि ज्वालामुखी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App