प्रतिनिधी
ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शरद पवारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. तिच्या विरोधात तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच तक्रारीवरुन ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरु आहे. Actress Ketki Chitale arrested for posting offensive post about Sharad Pawar
शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर, राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले होते. केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्याच प्रकरणी आता केतकी चितळेला ताब्यात घेण्यात आले आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे, महाराष्ट्रातील मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांच्या नेत्यांनी केतकी चितळे हिच्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध केला आहे. महाराष्ट्र अशा प्रकारची राजकीय विकृती नाही. राजकीय संस्कृती अस्तित्वात आहे. राजकीय टीका एकमेकांविरुद्ध जरूर होत राहाते. परंतु कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचा सामना शरद पवार करत असताना त्यांच्याविषयी विकृत पोस्ट पूर्णपणे निषेधार्हच आहे, अशी पोस्ट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे केतकी चितळे च्या मागे मनुवादी असल्याची टीका नेहमीप्रमाणे छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तिला चार चापट्या लावण्याची भाषा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App