पंकज त्रिपाठी यांना ‘या ‘मराठी पदार्थाची भुरळ!

विशेष प्रतिनिधी

पुणे : हिंदी चित्रपट सृष्टीत गेले काही वर्ष आपल्या अभिनयाने रसिक मनावर वेगळीचं छाप सोडणारे सध्या आघाडीजे अभिनेते पंकज त्रिपाठी हे सिनेमानं सोबतच ओटीटी च्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत.पंकज त्रिपाठी यांनी लुडो,स्त्री,लुका छुपी, अशा अनेक गाजलेल्या कलाकृतीतून ते चाहत्यांच्या आणखी जवळ आले.सध्या पंकज त्रिपाठी हे ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पंकज त्रिपाठी यांनी नुकतंच एका मराठमोळ्या पदार्थाबद्दल भाष्य केले आहे. Actor Pankaj Tripathi News



पंकज त्रिपाठी हे मूळचे बिहार या राज्यातील असून, गेली अनेक वर्ष ते महाराष्ट्रात राहतात. पंकज त्रिपाठी यांनी नुकतंच मशाबले इंडिया या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी द बॉम्बे जर्नी मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी मुंबईच्या आठवणी ताज्या केल्या. तसेच त्यांनी मुंबईत कुठे खायला आवडतं, याबद्दलही भाष्य केले.मी घराबाहेर फार खात नाही. शूटींगच्या वेळीही सेटवर खिचडी तयार करुन खातो. त्यामुळे पोट हलकं राहतं. तसेच कधी बाहेर खायचं असेल तर मी फक्त दक्षिणायनची इडली, डोसा खातो. मला ते पदार्थ फार आवडतात. याबरोबरच मला झुणका भाकरी खूप आवडते. पण मुंबईत आता झुणका भाकरी मिळतच नाही. झुणका भाकर केंद्र असं नाव लिहिलेलं असतं, पण तिथे वडापाव मिळतो.

पुणे-वाई रस्त्यावर शिवराज चौहान नावाचे माझे मित्र राहतात. मी अनेकदा त्यांच्या घरी केवळ झुणका भाकरी खाण्यासाठी जातो. त्यांच्या घरचं तूप, त्यांच्या शेतातला इंद्रायणी तांदूळ असतो”, असे पंकज त्रिपाठींनी म्हटले.दरम्यान, पंकज त्रिपाठी यांनी बिहारच्या छोट्या गावातून सुरु केलेला बॉलीवूडपर्यंत प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांना आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. सध्या त्यांचा अक्षय कुमारसह मुख्य भूमिकेत असलेला ‘OMG 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे.

Actor Pankaj Tripathi News

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात