मुंबई म.न.पा प्रमाणे लवकरच राज्यातील औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव महानगरपालिकेत हा निर्णय घेतला जाणार आहे.Abolish property tax on 500-foot houses in the city; Demand of Nationalist Congress Party
विशेष प्रतिनिधी
धुळे : नुकतेच मुंबई महानगरपालिकेने ५०० फुटांच्या घरांची मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर धुळे महानगर पालिकेने धुळे शहरातील ५०० फुटांच्या घरांची मालमत्ता कर रद्द करावी,
अशा मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे महापालिका आयुक्तांसमोर सादर करण्यात आले आहे.धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मजुर, कारागीर, शेतकरी, छोटे व्यावसायिक, खाजगी कर्मचारी राहतात.
दरम्यान ५०० फुटांपर्यंत घरांची मालमत्ता कर रद्द केल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रणजित भोसले यांनी व्यक्त केली आहे.तसेच मुंबई म.न.पा प्रमाणे लवकरच राज्यातील औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव महानगरपालिकेत हा निर्णय घेतला जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App