विशेष प्रतिनिधी
धुळे : चाळीसगाव धुळे या मेमो रेल्वेचा उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन झाले. यावेळी चाळीसगाव येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार उपस्थित होते. The Chalisgaon-Dhule railway finally ran after two years; Online inauguration of Memo Railway by Danve
गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव-धुळे रेल्वे सर्वप्रथम कोळशावर नंतर डिझेलवर सुरू होती, मात्र धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे तसेच जळगावचे खासदार उमेश पाटील यांनी पाठपुरावा करून चाळीसगाव धुळे विद्युत रेल्वे सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी केली होती. या विद्युत रेल्वेचा उद्घाटन सोहळा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडला यावेळी चाळीसगाव येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अब्दुल सत्तार, जळगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण धुळ्याचे महापौर प्रदीप करपे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थितीत हिरवा कंदील दाखविला.
या विद्युत रेल्वे मुळे शेतकरी शेतमजूर तसेच व्यापारी आणि विद्यार्थी यांची मोठी सोय झाली. अत्याधुनिक पद्धतीची ही रेल्वे धुळे जिल्ह्यात प्रथम आल्याने सर्वांसाठी आकर्षणाची विषय ठरली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची वेळेची बचत होणार आहे. मुंबई लोकल च्या धर्तीवर ही रेल्वे सुरू करण्यात आल्याने नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा मिळणार आहे. चाळीसगाव-धुळे सह धुळे जिल्ह्यातून इतर रेल्वेमार्गासाठी देखील आपण प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.
काय आहेत वैशिष्ट्ये
-अत्याधुनिक पद्धतीची ही विद्युत रेल्वे आहे
– रेल्वेच्या दोन्ही बाजूला इंजिन आहे
– दोनशेहून अधिक प्रवासी डब्यातून प्रवास शकणार
– बायो टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे
– एलईडी लाईट बसविण्यात आले आहेत
– ऊर्जा कार्यक्षम इलेक्ट्रिक प्रणाली बसविली आहे
– या रेल्वेमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App