विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणाची वकिली चालवली आहे, पण महायुतीला मोठा भाऊ भाजपला हे खपवून घेता येईल का??, असा असा सवाल त्यामुळे तयार झाला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम आरक्षणाची मागणी करून शिंदे – फडणवीस सरकारला पेचात पकडले असताना त्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याच्या इंधनपुरवठ्याची भर पडली आहे. Abdul Sattar’s advocacy of Muslim reservation while sitting in the Shinde-Fadnavis government
मनोज जरांगे हे महाराष्ट्राचे आयकॉन आहेत. येत्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला त्यांच्या संदर्भात मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला. त्याचवेळी त्यांनी मुस्लिम आरक्षणाची वकिली केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुस्लिम आरक्षणाचा विषय आम्ही कानावर घातला आहे. देशभरामध्ये मुस्लिमांचे केंद्र सरकारच्या विरोधात मतदान झाले याची दखल घेऊन पावले उचलण्याची सूचना आम्ही केली आहे, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार मूळ शिवसैनिक नाहीत
शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसून मुस्लिम आरक्षणाची वकिली करणारे अब्दुल सत्तार हे मूळात शिवसैनिक नाहीत. ते मूळचे काँग्रेसचे आमदार होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे ते समर्थक मानले जात होते. त्यामुळे अब्दुल सत्तारांची मूळ राजकीय संस्कृती काँग्रेसीच आहे. ती शिवसेनेची नाही. पण बदलत्या परिस्थितीमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊन दाखल झाले. त्याच्या आधीच अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या अखंड शिवसेनेत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली, पण त्यांची मूळ काँग्रेसी संस्कृती विसरली नव्हती. या काँग्रेसची संस्कृतीतूनच त्यांनी मुस्लिम आरक्षणाची वकिली चालवली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायमच मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात राहिले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ओबीसी आणि मुस्लिम आरक्षण हा विषय तापला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी कोणत्याही स्थितीत धार्मिक आधारावर मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही. कारण ते घटनाबाह्य ठरेल, असे स्पष्ट केले होते. भाजपने धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षणाला कायमच विरोध केला आहे.
या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राहून अब्दुल सत्तार मुस्लिम आरक्षणाची वकिली करत असतील, तर ते कट्टर शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप खपवून घेतील का??, हा सवाल आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App