विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : मिसारवाडीची रहिवासी असलेल्या गुड्डीच्या प्रसूतीचा प्रवास दोन महिन्यांपूर्वी सुरू झाला. डॉ. विजय कल्याणकर यांनी पहिल्यांदा तिला तपासले. गुडीची केस इतरांपेक्षा निश्चितच वेगळी होती. कारण उपलब्ध असलेल्या वजन काट्याच्या पार जाणारे तिचे वजन होते.A woman weighing 155 kg Safe delivery; The seventh event in the world
गुडीला मधुमेह, उच्च रक्तदाबही होता. अशा वेळी प्रसूती करणे आव्हानात्मक होते. डॉ. कल्याणकर यांनी हे आव्हान स्वीकारण्याचे ठरवले. विभागप्रमुख डॉ. गडप्पा यांनीही विशेष प्रयत्न केले. तिला दररोज चालवण्यास सांगितले जात होते. फुप्फुसाचे व्यायाम करून घेण्यात आले. शरीराच्या विविध भागांवर बुरशीचा संसर्ग होता.
चरबी प्रचंड असल्याने बाळाचे ठोके ऐकूच येत नव्हते. दिवसभरातून तीन वेळा सोनोग्राफीच्या माध्यमातून बाळाचे ठोके तपासले जात होते. तिला एका जागेवरून दुसरीकडे हलवण्यासाठी मदतीची गरज होती. प्रचंड वजनामुळे तिला सांभाळणे कठीण होते. व्हीलचेअरमध्ये देखील ती मावत नव्हती. नेमके वजन किती हे जाणून घेण्यासाठी अखेर पोती मोजली जातात तसा काटा आणला. कारण वजन कळल्याशिवाय उर्वरित तपासण्या व प्रसूती ही करण्यासाठी डॉक्टरांना परवानगी दिली.
तब्बल १५५ किलो वजनाच्या या २८ वर्षीय महिलेची अतिशय गुंतागुंतीची प्रसूती औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या घाटी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूपपणे केली. वैद्यकीय जर्नल्समध्ये आजवर अशा प्रकारच्या फक्त सहा केस आहेत. गुड्डी जगातील अशी सातवी महिला ठरणार आहे, असे प्रसूती विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गड्डप्पा यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App