विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमधे अडकवण्यात आले. या व्यापाऱ्याकडून जवळपास सव्वातीन कोटी रुपयांची रक्कम उकळण्यात आली. आणखीन पैशाची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी गुन्हा शाखेमध्ये तक्रार दाखल केली.
A trader from Kolhapur was caught in a honey trap
संबंधित तक्रारदार व्यवसायानिमित्त २०१६ मध्ये गोवा येथे गेले असता त्यांची आरोपी महिलेसोबत ओळख झाली होती. असे गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार समोर आले. या प्रकरणामध्ये फॅशन डिझायनर महिला तसेच आणखी दोन सराफांना अटक करण्यात आली. मनीष सोदी, अनिल चौधरी आणि लुबना वझीर अशी या आरोपींची नावे आहेत. हे तिघे आरोपी अंधेरी येथे राहणारे असून त्यातील लूबना ही फॅशन डिझायनर आहे व अनिल आणि मनिष हे सराफ आहेत.
Honey Trap : भारतीय लष्कराचे गुप्त दस्तऐवज पाकिस्तानी महिला एजंटला पुरवले, टपाल सेवा अधिकाऱ्याला अटक
गुन्हा शाखेच्या माहितीनुसार २०१६ मध्ये त्या महिलेशी ओळख झाल्यानंतर त्या दोघांचे २०१९ मध्ये मैत्रीत रूपांतर झाले. २०१९ मध्ये लुबना हिने त्या व्यापाऱ्याला ती आणि तिच्या मैत्रिणीसोबत जेवण करण्याचा आग्रह केला. जेवण, गप्पा झाल्यानंतर ते तिघे त्यांच्या रूममध्ये गेले. संबंधित महिलेने व्यापाराला बोलण्यात गुंतवले व अचानक टॉवेल गुंडाळून बसलेल्या दुसऱ्या महिलेने धमकावत व्हिडिओ करण्यास सुरुवात केली व तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. मार्च १९ ते आतापर्यंत त्या व्यापाऱ्याकडून तीन कोटी २६ लाख रूपये त्या महिलेने लुटले.
आणखी पैशांची मागणी झाल्यानंतर शेवटी त्या व्यापाऱ्याने गुन्हा शाखेत तक्रार केली व कक्ष १० यांनी तपास सुरू केला. १८ नोव्हेंबर रोजी आरोपींनी १७ लाख रुपयांची मागणी करून त्याला अंधेरीतील एका कॉफी शॉपमध्ये बोलवले. पैसे घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पथकाने सापळा रचून त्या आरोपींना अटक केली. या तिघांना अटक करण्यात आली असून पसार झालेल्या महिलेचा शोध अद्याप सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App