मतदानादिवशी बारामतीत सहानुभूतीचा नवा खेळ; अजितदादांच्या घरी जाऊन आशाकाकींची भेट!!

विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी 11.00 वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान झाले असले म्हणजेच मतदानाचा टक्का घसरला असला, तरी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी सहानुभूतीचा नवा डाव खेळत अजितदादांचे घर गाठले आणि आशाकाकींची भेट घेऊन त्यांना नमस्कार केला.A new sympathy game in Baramati on polling day; Going to Ajidad’s house and meeting Ashakaki!!

आज बारामती मतदारसंघातले मतदान सुरु होताच शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे बारामतीमधील काठेवाडीत मतदानासाठी दाखल झाल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहचल्या. तेथे सुप्रिया सुळे फक्त पाचच मिनिटे होत्या पण त्याची बातमी मात्र राज्यभर झाली.



सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरी मंगळवारी 11.00 वाजेच्या सुमारास दाखल झाल्या. त्यावेळी घरात अजित पवार होते. परंतु सुनेत्रा पवार नव्हत्या. त्या काकींची भेट घेणे आणि प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आल्या होत्या. गेले साधारण दोन महिने प्रचाराच्या धबडग्यात आशाकाकींची भेट घेणे सुप्रिया सुळे यांना शक्य झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे येऊन आशाकाकींना भेटल्या. यावेळी त्यांची आणि अजित पवार यांच्याशी काही चर्चा केली नाही. त्या फक्त त्यांच्या काकी आशाताई पवार यांनाच भेटल्या, असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे??

मी आशाकाकींना नमस्कार करण्यासाठी आले होते. घरात फक्त मी आणि काकीच होते. मी फक्त काकींची भेट घेतली. तुम्ही अजित पवार यांच्या घरी अचानक आल्या? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांचा विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले, हे माझ्या काका, काकींचे घर आहे. माझ्या आयुष्यातील लहाणपण याच घरात गेले आहे. मी या घरात दोन- दोन महिने राहिले आहे. त्यावेळी दोन-दोन महिने माझ्या आईशी बोलणे होत नव्हते. जेवढे माझ्या आईंनी माझे केले नाही, तेवढे माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केले, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

A new sympathy game in Baramati on polling day; Going to Ajidad’s house and meeting Ashakaki!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात