पुण्यात दाखल झालेल्या हापूस आंब्याच्या पाच डझनच्या पेटील 31 हजार रुपये भाव मिळाला.कोकणातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या शुक्रवारी मार्केट यार्डात दाखल झाल्या.A mango for five hundred rupees, a box of five dozen hapus for Rs. 31,000 in Pune
विशेष प्रतिनिधी
पुणे – पुण्यात दाखल झालेल्या हापूस आंब्याच्या पाच डझनच्या पेटील 31 हजार रुपये भाव मिळाला.कोकणातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या शुक्रवारी मार्केट यार्डात दाखल झाल्या.
देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होतो. त्या पार्श्वभूमीवर हापूस आंबा मार्केट यार्डात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ या गावातून शेतकरी मकरंद काने यांच्या बागेतून गणेश फ्रुट एजन्सी, अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर पाच पेट्या शुक्रवारी आल्या होत्या. लिलावात व्यापारी युवराज काची यांनी तब्बल ३१ हजार रुपयांना एक पेटी याप्रमाणे खरेदी केल्या. बाजार आवारातील ज्येष्ठ आडते एकनाथ यादव, आडते असोसिएशनचे संचालक गणेश यादव, रावसाहेब कुंजीर, सुनील वंजारी, जगन्नाथ वंजारी, अब्दुल चौधरी, निलेश शिंदे यांच्यासह बाजारातील अडते उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App