दावा करणे आणि बहुमत असणे यात मोठे अंतर; रावसाहेब दानवे यांचा अजितदादांच्या मुख्यमंत्री पदावर टोला


प्रतिनिधी

मुंबई : अजित पवारांच्या कथेत बंडाच्या बातम्या महाराष्ट्राच्या हवेत राजकीय हवेत तरंगत असतानाच स्वतः अजितदादांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत.A large gap between claiming and being a majority; Raosaheb Danve’s attack on Ajit Dada’s post of Chief Minister

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी अजित दादांना वास्तवाची जाणीव करून दिली आहे मुख्यमंत्रीपदावर दावा करणे आणि बहुमत असणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे अजितदादांना एक तर बहुमताच्या बाजूने यावे लागेल किंवा त्यांच्या पक्षाला बहुमत मिळण्यासाठी अजून 10 – 20 वर्षे वाट तरी पाहावी लागेल, असा टोला रावसाहेब पाटील दानवे यांनी लगावला आहे.

आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला निश्चितच आवडेल आणि त्यासाठी 2024 कशाला वाट पाहायचे आता सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो असे वक्तव्य अजितदादांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले. अजितदादांनी पुन्हा एकदा 2004 च्या राष्ट्रवादीच्या निर्णयावर परखड मत व्यक्त केले. 2004 मध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 आमदार निवडून आले होते, तेव्हाच मुख्यमंत्रीपद स्वीकारायला हवे होते. तेव्हा 69 आमदार असलेल्या काँग्रेसला दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाची संधी कायमची हुकली, असे शरसंधान अजितदादांनी शरद पवारांच्या निर्णयावर केले होते. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी सकाळच्या मुलाखतीत केला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने आर. आर. आबा पाटलांना नेतेपदी निवडले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधून तेच मुख्यमंत्री झाले असते. पण दिल्लीत वेगळा निर्णय झाला आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे गेले. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा तो निर्णय चुकला, असे वक्तव्य अजितदादांनी सकाळच्या मुलाखतीत केले आणि त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाची स्वतःची मुख्यमंत्रीपदाचे महत्त्वाकांक्षा जाहीर केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अजितदादांना वेगळ्या टोला हाणला आहे. मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडत नाही, पण शेवटी राजकारणात संख्याबळ लागते. नुसतं तोंडाने म्हणजे तोंडी बोलून मुख्यमंत्री होता येत नाही. पण अजितदादा मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना शुभेच्छा, असा टोला बावनकुळे यांनी हाणला.

A large gap between claiming and being a majority; Raosaheb Danve’s attack on Ajit Dada’s post of Chief Minister

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात