भीषण दुर्घटना : रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; चौघांचा मृत्यू, अनेकजण दबले गेल्याची भीती!


घटनाास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल; बचावकार्यासाठी गेलेल्या  अग्निशमन दलाच्या जवानाचाही मृत्यू

विशेष प्रतिनिधी

रायगड :  सध्या राज्यभर जोरदार पाऊस  सुरू आहे. परिणामी पावसाळ्यातील आपत्तीही घडताना दिसत आहेत. अशाचप्रकारे रायगडमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात  दरड कोसळली असून, प्राप्त माहितीनुसार  चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि तीन जण जखमी झाले आहेत. याशिवाय, अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.  A landslide occurred in Irshalwadi village in Raigad

दरम्यान या दुर्घटनेची माहिती  मिळाल्यानंतर बचावकार्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. याशिवाय  घटनास्थळी मदत  व बचावकार्यासाठी एनडीआरएफची  दोन पथकं दाखल झाली आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांनी  नियंत्रण कक्ष सुरू केला असून, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकासमंत्री दादा भुसे हे घटनेची पाहणी करण्यासाठी इर्शाळवाडीत  दाखल झाले आहेत.

A landslide occurred in Irshalwadi village in Raigad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात