विशेष प्रतिनिधी
पुणे : सासवड-बोपदेव रस्ता, येवलेवाडी येथे एका गोडाऊनमधे आज पहाटे साडेपाच वाजता आग लागली होती. अग्निशमन दलाची 8 वाहने व जवान घटनास्थळी असून आग नियंत्रणात आली आहे.A huge fire broke out in a godown in Yeolawadi
आगीत कोणीही जखमी झाले नाही किंवा जिवितहानी झाली नाही. आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले असावे, असा अंदाज आहे. पोलीस पंचनाम्यात या बाबी स्पष्ट होतील. येवलेवाडी येथे औद्योगिक गोदामे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आली आहेत.
दरम्यान, बुधवारी गंगाधाम चौक, वर्धपानपुरा सोसायटी येथे एका वायरवर पोपटाचा पाय दोरीमधे अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सतराव्या मजल्यावर जात गॅलरीमधून शिताफीने बर्ड रेस्क्यू स्टीकला घरातील चाकू जोडून पायाची दोरी अलगद कापत पोपटाची सुखरुप सुटका केली. जवान सुनिल टेंगळे व देवदूत जवान परशुराम जक्कुने, ऋषिकेश गित्ते, मयुर कारले यांनी उत्तम कामगिरी पार पाडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App