पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून या आगीत कोणतीही जीवतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. A huge fire broke out at the godown in Byculla, 4 hours struggle to put out the fire
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भायखळा येथील मदनपुरा येथील गोडाऊनला बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आग लागली.या आगीवर तब्बल ४ तासांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून या आगीत कोणतीही जीवतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची चौकशी स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाकडून केली जात आहे.
भायखळा, मदनपुरा येथील तस्लिमा हाईट या बिल्डिंगच्या जवळ तळ मजला अधिक एक असे दुमजली लेदरचे गोडाऊन आहे. गोदामातील लेदरच्या साठ्यामुळे आग आणखीन भडकली.आग लागलेल्या गोडाऊनच्या बाजूला अनेक बैठी बांधकामे आहेत. अग्निशमन दलाने आगीची लेव्हल २ ची झाल्याचे जाहीर केले.
या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ फायर इंजिन, ५ जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने सदर आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.तब्बल ४ तास आगीशी झुंज दिल्यानंतर रात्री ११.१५ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.आगीमुळे गोडाऊन जळून मोठी वित्त हानी झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App