मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊन भिषण आग ; कुठलीही जीवितहानी नाही , अग्निशमनदलाच्या १२ गाड्या घटनास्थळी हजर


आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.A fierce fire at a plastic godown in the Mandala area of ​​Mankhurd; No casualties were reported, 12 fire trucks arrived at the scene


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊनला भिषण आग लागली.ही आग पहाटे तीनच्या सुमारास लागली आहे. दरम्यान स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. दरम्यान अग्निशमनदलाच्या १२ गाड्या घटनास्थळी हजर झाल्या.

अग्निशमन दलाचे १५० जवान ही आग विझवण्याचे काम करत आहेत. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान मानखुर्द परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भंगाराचे गोडावून आहेत. तसेच या परिसरात लोकवस्ती देखील दाट आहे. नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

A fierce fire at a plastic godown in the Mandala area of ​​Mankhurd; No casualties were reported, 12 fire trucks arrived at the scene

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात